मुरगूड ( शशी दरेकर ) – सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड अंतर्गत महात्मा फुले ग्रंथालयामध्ये आज दि. ९ ऑगस्ट रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. सुरुवातीस उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल प्रा. टी.एच. सातपुते यांनी केले. त्यांनी डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या ग्रंथालय शास्त्राच्या कार्याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. टी.एम. पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी ग्रंथांचे व ग्रंथालय शास्त्राचे महत्त्व सांगितले आणि डॉ. एस.आर. रंगनाथन यांना जयंती निमित्त अभिवादन केले. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. शिवाजीराव होडगे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. शिवाजी पोवार, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ. एम. ए. कोळी, नाईक श्री. डी.जी.कांबळे, ग्रंथालय परिचर श्री. संजय भारमल, श्री. सदाशिव गिरीबुवा तसेच एनसीसी चे सर्व विद्यार्थी व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी आभार ग्रंथालय परिचर व बस्तवडे गावचे माजी सरपंच साताप्पा कांबळे यांनी मानले.