मुरगूड (शशी दरेकर) :येथील सानिका स्पोर्टस् फौंडेशनच्या वतीने मुरगूड शहरात धुणीभांडी करणाऱ्या व मुरगूड नगरपरिषदेत आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या महिलांना दिपावली निमित्त साडी वाटप तसेच आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना मोती साबण, सुवासिक तेल , एक किलो पोहे, उटणे, पणती पाकीट साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवराज विद्यालयाचे माजी प्राचार्य जीवनराव साळोखे ,मुरगूड विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा .शाम पाटील ,डॉ. रणजित साठे ,डॉ. रमेश भोई , माजी प्राचार्य महादेव कानकेकर ,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा .सुनिल डेळेकर , उपप्राचार्य प्रा .रविंद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पांडूरंग कुडवे , डॉ. रमेश भोई , महादेव कानकेकर ,प्रा .शाम पाटील , जीवनराव साळोखे यांची सानिका फौंडेशनच्या विधायक कामाबद्दलची गौरवास्पद भाषणे झाली . यावेळी डॉ. विजय कल्याणकर डॉ .बबन भारमल , डॉ. सचिन भारमल उपमुख्याध्यापक संजय सूर्यवंशी ,अनिल पाटील , संदिप सुर्यवंशी , प्रकाश तिराळे , ओंकार पोतदार , समीर कटके , आप्पाजी मेटकर , विजय मोरबाळे , राजू चव्हाण , पांडूरंग कुडवे , निवास कदम , सागर सापळे, बाबूराव रेंदाळे यांच्यासह धुणीभांडी करणाऱ्या व मुरगूड नगरपरिषदेत आरोग्य विभागाकडे काम करणाऱ्या महिला व कर्मचारी ,सानिका स्पोर्टस् चे पदाधिकारी , पत्रकार बंधू , नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते . स्वागत सानिका स्पोर्टस् चे अध्यक्ष सुशांत मांगोरे यांनी केले . प्रास्ताविक सानिका स्पोर्टस् चे संस्थापक अध्यक्ष ,माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी केले .सुत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले . तर आभार नंदकिशोर खराडे यांनी मानले .