पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द येथील नवाळे समूहाच्या दूध संस्थेच्या बोनस वाटप कार्यक्रम संपन्न झाला .समूहाच्या वतीने श्री इंदिरा सहकारी दूध संस्था, श्री कृष्णामाई महिला दूध संस्था ,आणि अशोकराव नवाळे दूध संस्थेच्या वतीने दूध उत्पादक व कर्मचारी यांना उच्चंकी बोनस वाटप संस्थेच्या संस्थेचे अध्यक्ष अशोक नवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
संस्थेमार्फत म्हैस दूध खरेदीवर 17% तर गाय दूध खरेदीवर 12% प्रमाणे एकूण 15 लाख 77 हजार रुपयांचा बोनस वाटप करण्यात आला.याशिवाय कर्मचाऱ्यांना तीन पगार इतका बोनस वितरणही वितरण करण्यात आला.
म्हैस व गाय दूध उत्पादनात अग्रेसर असणारे सारिका पाटील, अण्णाप्पा कुरुंदवाडे, संपत्ती तेलवेकर तर गाय दूध उत्पादनात शंकर तेलवेकर ,सदाशिव कडवे ,अविनाश वठारे यांनी उच्चाकी दूध उत्पादन घेतल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला .यावेळी संस्थेचे चेअरमन अशोक वठारे,आनंदा जाधव, मधुकर मगदूम, नेताजी टिपुगडे, राजाराम मोरे ,बिरु रेवडे अशोक पाटील याच्या सह अनेक दूध उत्पादक, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी स्वागत रमेश वाइंगडे यांनी केले तर आभार गणेश घाटगे यांनी मानले.
फोटो: पिंपळगाव खुर्द येथील नवाळे समूहाच्या वतीने दूध उत्पादकांना बोनस वाटप करताना समूहाचे अध्यक्ष अशोक नवाळे सोबत इतर मान्यवर.