गजानन महाराज सेवा संस्थेचा तेरा वर्षाचा उपक्रम
व्हनाळी (सागर लोहार) : श्रावणी सोमवार निमित्त बेलवळे खुर्द ता.कागल येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, शिवसेना तालुका प्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी बेलवळे , पिराचीवाडी,सावर्डे येथील शिवभक्तांना महादेवाची पिंड व बेलरोपाचे मोफत वाटप करण्यात आले.
अशोकराव पाटील म्हणाले, भगवान शंकराला श्रावण महिना प्रिय असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे ताप केले होते. असे सांगितले जाते कि श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपुजनात जलाभिषेक रुद्रभिषेकाला विशेष महत्व असते. म्हणून श्रावण सोमवारच्या दिवशी शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने शिवाला केवळ एक बेलाचे पान जरी अर्पण केले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते म्हणून गेली तेरा वर्षे आपण हे वाटप करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बेलवळे खुर्द,पिराचीवाडी,सावर्डे ता.कागल परिसरात श्रावण सोमवार दिवशी शिवभक्तांना रूद्राक्षमाळ, भस्म, महादेवाची पिंड, बेल रोपाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास डि.के भोसले, दिलीप लाड, संजय भोसले, निवृत्ती पाटील ,अजित पाटील,धैर्यशील पाटील, सौ.आक्काताई माने,वैभ पाटील, सौ.सीमा भोसले, सौ.कांचन माने,भीमराव माने, सुशीला भोसले,सौ.सरस्वती माने, संदीप कांबळे, डॉ,इंद्रजित पाटील, डॉ.संजय चींदगे, प्रताप पाटील,शंकर जाधव शिवभक्तगण व महिला उपस्थित होत्या.