
पिंपळगाव खुर्द(मारुती पाटील): पिंपळगाव खुर्द तालुका कागल येथील ग्रामपंचायत मार्फत प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा दोन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना सरपंच सौ शीतल अमोल नवाळे, उपसरपंच सदाशिवराव चौगले यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्य जे डी कांबळे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांमध्ये गावातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीच्या आदेश पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि लाभार्थ्यांच्या उपस्थितीत हे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थितीताना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य, प्रशासकीय अधिकारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी आभार भिवा आक्कुर्डे यांनी मानले.