गडहिंग्लज – धनंजय शेटके
सध्या महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यात कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असून.महाराष्ट्र राज्यातील शाळा,महाविद्यालये देखील सुरू झाली आहेत.गडहिंग्लज हे सीमा भागातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र असून सिमा भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी गडहिंग्लज मध्ये येतात.पण सीमा भागातील एस.टी वाहतूक अजून बंदच असून याचा त्रास विद्यार्थी व नागरिकांना होत आहे.तसेच गडहिंग्लज संकेश्वर एस.टी बस ही राज्य हद्दी पर्यंतच धावत असल्या मुळे वडाप वाहतूक वाले आपल उखळ पांढरे करून घेत आहेत.त्याचा आर्थिक नुकसान नागरिकांना होत आहे. ह्या आगार व्यवस्थापकानी संकेश्वर आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढावा आणि नागरिक व विद्यार्थी यांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे गडहिंग्लज शहर प्रमुख संतोष चीकोडे, उपशहर प्रमुख महांतेश गाताडे,काशिनाथ गडकरी आदी शिवसैनिकांनी केली आहे हे निवेदन गडहिंग्लज आगार व्यवस्थापक संजय चव्हाण यांनी स्वीकारले.