कागल(विक्रांत कोरे) – दक्खन चिकन ट्रेडर्स व रुद्राज एग्ज सप्लायर्सच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कुमार व कन्या विद्या मंदिर सिध्दनेर्ली या शाळेस क्रिकेट, फुटबॉल, कॅरम, बुध्दीबळ, लेझीम इत्यादी साहित्य ट्रेडर्सचे मालक अक्षय पाटील व त्यांच्या टीमने शाळेस भेट म्हणून दिले. यावेळी त्यांच्या टीमचा यथोचित सत्कार कुमार विद्या मंदिर सिध्दनेर्लीचे मुख्याध्यापक गणपती धनगर (पुजारी) यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका शालन कुंभार, विद्या चव्हाण, दीपा ठोंबरे, श्री वारदाळे, श्री काळेबरे, सौ.धराळ, सौ. पाटील आणि स्वागत विद्या भोसले यांनी केले, आभार सौ. विद्या चव्हाण, यांनी मानले.