मुरगूड (शशी दरेकर) : लिंगनूर-कापशी येथिल शेतामध्ये बेवारस पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला आहे. १६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नारायण आवळे यांच्या नागराळ नावाच्या शेतामध्ये हा मृतदेह आढळला.
याबाबतची वर्दी गावकामगार पोलीस पाटील बापुसो पाटील यानीं मुरगूड पोलिस ठाण्यात दिली.
अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट, काळ्या रंगाची नाईट पॅट, उंची ५ फुट २ इंच, रंग -सावळा व उजव्या हातावर स्टार चिन्हामध्ये D असे इंग्रजी अक्षर आणि उजव्या दंडावर बदाम -चिन्हामध्ये P.S. अशी अक्षरे गोंदलेली आहेत.