
कागल मध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले
कागल : येथील अखिलेश पार्क मध्ये अतुल दिवटे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने लोखंडी खिडकीचे ग्रिल तोडुन घरातील कपाट उघडुन कपाटातील रोख २५,०००/- रक्कम चोरून नेली.
सदर घटना बुधवार दिनांक १० मे रोजी दुपारी बारा साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. लोकवस्तीत होत असलेल्या चोऱ्यामुळे नागरिकामध्ये भीती चे वातावरण आहे. सदर चोरी चा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल व्ही टी पाटील करत आहेत.

अलीकडे काही दिवसापूर्वी जयसिंगराव पार्क येथे घरफोडी ची घटना ताजी असतानाच आता परत चोरी घटनेने परिसरातील भीतीजन्य वातावरण झाले आहे. तसेच श्री. घाटगे यांच्या दत्त कॉलनी येथील घरी मोठी चोरी झाली होती. या चोऱ्याचा तपास चालू असताना नव्याने चोऱ्या होत असून एक प्रकारे चोरटे पोलीस यंत्रणेला आव्हान देत आहेत.
It means the world to us to hear such positive feedback on our blog posts. We strive to create valuable content for our readers and it’s always encouraging to hear that it’s making an impact.
I appreciate your creativity and the effort you put into every post. Keep up the great work!