कागल : कागल शहर आणि परिसरामध्ये घरफोडीचे प्रकार झाले आहेत. पोलीस ठाण्याच्या वतीने याचा निश्चित बंदोबस्त केला जाईल. यासाठी सक्षम नागरिकांनी सीसीटीव्ही लावावेत, तसेच आपल्या घराच्या आजूबाजूला रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करावी.
शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कागल पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले.
कागल पोलीस ठाण्याचा कार्यभार लोहार यांनी स्वीकारला. पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.