उद्या पोर्टल सुरू न केल्यास राज्यव्यापी आंदोलन करणार – कॉ भरमा कांबळे
सिद्धनेर्ली : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे बंद असलेले पोर्टल उद्यापासून सुरू करणार असल्याची माहिती लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ भरमा कांबळे यांना मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी दिली.उद्या पोर्टल सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा लाल बावटा संघटनेचे कॉ भरमा कांबळे यांनी दिला आहे.तसेच एजंट व दलालांना आवर घालण्यासाठी केंद्रीय कामगार संघटनांना युजर आयडी पासवर्ड देण्यात यावा अशी ही मागणी यावेळी केली आहे.
बांधकाम कल्याणकारी मंडळाचे पोर्टल सुरू व्हावे यासाठी सिटुचा नेतृत्वाखाली राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले होतें. या पार्श्वभूमीवर मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी जानेवारी अखेर पोर्टल सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप पोर्टल सुरू न झाल्यामुळे आज मंडळाचे तज्ञ कमिटीचे माजी सदस्य व लाल बावटा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांनी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी उद्यापासून पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने, नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अर्ज भरण्यासाठी तालुका स्तरावर १ सप्टेंबर २०२४ पासून सेतु केंद्रे तयार केली आहेत. त्यामुळे कामगारांना आपली नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अर्ज भरायचे झाल्यास तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत होते .तालुक्याच्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्याचे काम होईलच याची कोणतीही गॕरेंटी नव्हती. प्रत्येक सेतु केंद्रामध्ये दररोज एकुन नोंदणी, नुतणीकरण – ५०,व लाभाचे ३० अर्ज भरण्यासाठी कामगारांना टोकण देण्यात येत होती व नतंर येणाऱ्या ५० च्या पुढच्या कामगारांना परत परत जावे लागत होते.
कामगारांना आपल्या कामाचा खोळंबा करून प्रवासाचे पैसे खर्च करून हेलपाटे मारावे लागत होते. त्यामुळे कामगारांच्या मध्ये प्रचंड असंतोष तयार झाला होता.मंडळाने ऑनलाईन प्रक्रिया सुरू करीत असताना कामगारांने त्याची नोंदणी, नुतणीकरण, व लाभाचे अर्ज घरबसल्या भरता यावेत त्याला कोणताही अर्थिक भुर्दंड बसु नये हा उद्देश होता. याउद्देशालाच हरताळ फासला होता. याविरोधात लाल बावटा संघटनेसह अनेक संघटनांनी, राज्यव्यापी आंदोलने केली होती. त्यामुळे उद्यापासून सदर पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती सचिव विवेक कुंभार यांनी दिली.
पोर्टल सुरू व्हावे यासाठी कॉ भरमा कांबळे, कॉ शिवाजी मगदूम, यांच्या नेतृत्वाखाली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कॉ प्रकाश कुंभार, कॉ भगवानराव घोरपडे, कॉ संदिप सुतार, विक्रम खतकर, शिवाजी मोरे, आनंदा कराडे, मोहन गिरी, रमेश निर्मळे, नामदेव पाटील, राजाराम आरडे, दगडू कांबळे, दिलीप माने, रामचंद्र नाईक, शिवाजी कांबळे, संतोष राठोड, उदय निकम, दिलीप माने, दत्ता गायकवाड, विजय विरळेकर, दत्ता कांबळे, नुरमहमद बेळकुडे यांनी आंदोलन केले होते तसेच सिटुच्या पुढाकाराने राज्यव्यापी आंदोलनही करण्यात आले होते.