सीए परीक्षा उत्तीर्ण कु.तेजल बल्लाळ हिचा सत्कार

व्हनाळी (सागर लोहार) : व्हनाळी (ता. कागल) येथील कु. तेजल शामराव बल्लाळ हिने चार्टर्ड अकौटंट (सीए) परीक्षा उत्तीर्ण होत कोल्हापूर विभागातून पाचवा क्रमांक पटकावला त्याबद्दल शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून तिचा सन्मान करण्यात आला.

Advertisements

या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात, तिने घेतलेल्या या अथक मेहनतीचे श्री घाटगे यांनी विशेष कौतुक केले. कागल तालुक्यातील व्हनाळी या ग्रामिण भागातील कन्येने सीए परीक्षेत मिळवलेले हे यश खुप अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

यावेळी दिनकर वाडकर (गुरूजी),पै.नामदेव बल्लाळ, संभाजी जाधव, शामराव बल्लाळ,,मारूती कुळममोडे,नामदेव वाडकर,गोरखनाथ वाडकर आदी उपस्थीत होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!