मुंबई, दि. २८ :- फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताची नेमबाज मनू भाकर हीने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात भारताला स्पर्धेतील पहिले ऑलिम्पिक कास्य पदक जिंकून दिल्याबद्दल तिचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी अभिनंदन केले.
भारतीय खेळाडू पँरीस ऑलिम्पिंकमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील आणि त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल, असा मला विश्वास आहे.मनू भाकर ही गेल्या २० वर्षांमध्ये व्यक्तिगत स्पर्धेत ऑलिम्पिंकच्या फायनलमध्ये पोहचलेली पहिली भारतीय महिला नेमबाज आहे.
यापूर्वी सूमा शिरुरनं २००४ साली अथेन्समध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.
या पदकांमुळे पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत योवळी भारतीय तसेच महाराष्ट्रातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारात जास्तीत जास्त पदके मिळविण्यासाठी खेळाडूंचे मनोबल उंचावेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Just wish to say your article is as surprising The clearness in your post is just cool and i could assume youre an expert on this subject Fine with your permission allow me to grab your RSS feed to keep updated with forthcoming post Thanks a million and please keep up the enjoyable work