कागल (प्रतिनिधी) : कागल एम एस ई बी कार्यालय आणि परिसरातील वीज बिल वसुली करणारे कर्मचारी वसुली करत असताना सर्वसामान्य लोकांना धमकावणे, अरेरावी करणे, उद्धट बोलणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे तशा तक्रारी संभाजी ब्रिगेड कडे दाखल झालेल्या आहेत.
तसेच कोणतीही पूर्व सूचना न देता वीज कनेक्शन कट केले जाते यासह अन्य इतर मागण्याबाबत एम एस ई बी कार्यालयाकडील अभियंता श्री घोलप साहेब यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन उभे केले जाईल अशा प्रकारचा इशारा दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष नेताजी बुवा, कागल तालुका अध्यक्ष सुनील जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष नितीन काळबर, पै. महादेव कोईगडे, अरुण जकाते, संताजी घोरपडे, रणजीत गिरी, मधुकर मोरबाळे, अतुल खद्रे, सागर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.