व्हनाळी आंबाबाई विकास संस्थेमार्फत सभासदांना 12 टक्के डेव्हिडंट वाटप
व्हनाळी(सागर लोहार) : सहकार ही सामान्य माणसांची चळवळ आहे. सहकारामध्ये अत्यंत शक्ती असून सामान्य शेतक-यांनी निर्माण केलेल्या या सहकार शक्तीचे रक्षण केले तर शेतक-यांचे कोटकल्याण करता येते हे या विकास सेवा संस्थांनी दाखवून दिले आहे. समाजाच्या कल्याणासाठी सहकारी संस्थाचं योगदान महत्वाचं असून, विश्वास हा त्यांचा महत्वाचा पाया आहे. सर्व सामान्यांचे दुःख सहकारी संस्थांनी कमी केले तर सहकार चळवळ अधिक वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन अन्नपुर्णा शुगरचे चेअरमन, मा.आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.
व्हनाळी ता.कागल येथील श्री आंबाबाई विकास सेवा संस्थेच्या डेव्हिडंट वाटप प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी आंबाबाई विकास संस्थेच्या सभासदांना 12 टक्के प्रमाणे एकुण 7 लाख 64 हजार रूपये डेव्हिडंट रक्मेचे वाटप मा.आम.संजयबाबा घाटगे यांचे हस्ते चेअरमन बाबुराव मेथे,व्हा.चेअरमन श्रीराम वाडकर, सचिव अशोक पाटील यांचे उपस्थीत करण्यात आले.
यावेळी बळळंत वाडकर, के.बी.वाडकर, हिंदूराव पोवार, दिपक हातकर, नामदेव वाडकर, आनंदा जाधव, विलास पाटील, गणपती कडवे, सुरेश मर्दाने आदी उपस्थीत होते. स्वागत सागर पाटील यांनी तर आभार राजाराम पाटील यांनी मानले.