कागल : कागल नगर परिषद कागल, संपूर्णअर्थ लाईव्हलीहुड फाउंडेशन, किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, लक्ष्मी फाउंडेशन यांच्या माध्यमातून कागल शहरात सुरू असणाऱ्या स्वच्छ व स्वयंपूर्ण कागल उपक्रमा अंतर्गत आज शनिवार दी 22 फेब्रुवारी रोजी ना गोपाळकृष्ण गोखले शाळेच्या सहकार्याने कागल शहरातील आझाद चौक, बापूसाहेब महाराज चौक,धनगर गल्ली,शिवाजी महाराज चौक या भागामध्ये शाळेच्या मुलांना घेऊन जनजागृती अभियान फेरी राबली.

या जनजागृती फेरी मद्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी झांज पथक,पथनाट्य व पोस्टर्स याचा समावेश करून अधिक अधिक लोकांनी स्वच्छ व सुंदर कागल ठेवण्यासाठी चे आवाहन करण्यात आले.


या वेळी, ना गोपाळकृष्ण गोखले विद्या मंदिर चे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी तसेच कागल नगर परिषद कागले चे कर्मचारी, संपूर्ण अर्थ फाउंडेशन चे वॉलेंटियर्स उपस्थित होते, या उपक्रमाचे संयोजन संपूर्णअर्थ फाउंडेशन आय ई सी टीम यांनी केले होते.