कागल ( विक्रांत कोरे): करनूर ता. कागल येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.मरिआई मंदिर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच सौ उल्फत समीर शेख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या विषयी शंभर सेकंद कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विविध वेशभूषा परिधान केलेले शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विशेष शाहू महाराजांची भूमिका कुमार संचित महावीर डूगे याने साकारली. शोभा यात्रेनंतर मरीआई मंदिर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शाहू महाराजांच्या विषयी श्रेयस कांबळे, सानिया शेख, श्रेया पाटील, जुवेरिया शेख, यश पाटील, अंसुल कांबळे या विद्यार्थ्यांसह विद्या मंदिर करनूर चे मुख्याध्यापक के.डी पाटील, मा. सरपंच लक्ष्मण भंडारे, विठ्ठल कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली. दरम्यान मनोगत व्यक्त केलेल्या विद्यार्थ्यांना सरपंच सौ. उल्फत शेख यांच्याकडून शील्ड देऊन गौरविण्यात आले. यावेळी गावामध्ये ठिकठिकाणी शाहू महाराजांच्या विषयी रांगोळी काढण्यात आली होती. तसेच रांगोळी स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते. शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
या संयुक्त कार्यक्रमाचे स्वागत वैभव आडके यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी श्वेता सुदर्शन हिने केले. कार्यक्रमास सरपंच सौ. उल्फत शेख, उपसरपंच प्रवीण कांबळे, ग्रामसेवक देवेश गोंधळी, मा. सरपंच आनंदराव पाटील, तानाजी भोसले, जयसिंग घाटगे, समीर शेख, सौ. संगीता पोपटराव जगदाळे, सौ. रेश्मा राजमहंमद शेख, मा. सरपंच सौ. कविता घाटगे, बाबुराव धनगर, बाळासो पाटील आदींसह करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका शकेरा मुजावर, विद्यामंदिर रामकृष्णनगर च्या मुख्याध्यापिका सौ. सुनंदा कोरवी आदींसह ग्रामपंचायत सदस्य, करनूर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या स्टाफ सर्व शिक्षक, विद्यामंदिर रामकृष्णनगर चे शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उपसरपंच प्रवीण कांबळे यांनी मानले.