मुरगूड येथील तरुणाचा आदर्शवत उपक्रम
मुरगूड (शशी दरेकर) :
मुरगूड येथील युवक ओंकार पोतदार त्यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांनी ४५ खुदाई कामगार कुटुंबियांना ऐन दिवाळी सणाच्या काळामध्ये जीवनावश्यक साहित्याचे तसेच दिवाळीसाठीच्या साहित्याचे वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. मुरगूड येथील ओंकार पोतदार हे समाजिक कार्यात सदैव अग्रेसर असतात.
कोरोना काळात तसेच महापूर काळात त्यांनी लोकांना मदत केली आहे . दरवर्षी ते त्यांचा आणि त्यांच्या वडीलांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करतात. यावर्षीही त्यांनी ४५ खुदाई कामगार कुटुंबांना दिवाळी तसेच जीवनावश्यक साहित्य वाटप करून त्यांची दिवाळी सुखाची केली .त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
या कार्यक्रमास ओंकार पोतदार, सोमनाथ यरनाळकर, विजय राजिगिरे, अक्षय पोतदार, विनायक येरुडकर, सिध्दांत पोतदार , दिग्विजय येरुडकर आदी उपस्थित होते.