कागल पोलीस ठाण्यात तक्रार
बाचणी(प्रतिनिधी): कागल तालुक्यातील बाचणी येथील जिल्हा परिषदेच्या बाचणी येथील प्राथमिक शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरांची चोरी झाली असून कागल पोलीसात अज्ञाता विरोधी तक्रार देण्यात आली आहे.
Advertisements
याबाबत माहिती अशी की, बाचणी येथे एम्पीथी फाउंडेशन व ग्रामस्थांच्या पैशातून सुसज्य अशी प्राथमिक शाळा उभारली आहे. मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सर्व भौतिक सुविधा प्राप्त करून दिल्या आहेत.
Advertisements

शाळेचे वैभव तसेस रहावे येथे सुरक्षितेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री साडेआठ नंतर शाळेच्या पूर्वेकडील बाजूचे ग्रीलवर चढून सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले आहेत. यामुळे शाळेची सुरक्षितता धोक्यात आली आहे.