मेळाव्याला जाण्यास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना कर्नाटक पोलिसांनी अडवले

कागल : विक्रांत कोरेमहाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजित महामेळावा टिळकवाडी (कर्नाटक) येथे असल्याने या मेळाव्यास शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजय देवणे यांनाही निमंत्रित केले होते.ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वरून जात असता कोगनोळी येथील आरटी- पीसीआर तपासणी नाक्यावर शांतता, सुव्यवस्था बिघडू नये या कारणाने महामेळाव्यात जाण्यास कर्नाटक पोलिसांनी त्यांना अडवून धरले व त्यांना परत महाराष्ट्रात … Read more

Advertisements

पवारसाहेबांनी समाजकारणाला पाठबळ दिले – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचे प्रतिपादन

८१ व्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका राष्ट्रवादीतर्फे परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर संपन्न ८१ ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्राने गौरव  कागल : देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी हयातभर समाजकारणाला पाठबळ दिले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.  पाटील यांनी केले. सर्वच जाती -धर्मांना सोबत घेऊन सामाजिक सलोख्यातून शांतता या … Read more

बाचणी बंधाऱ्याजवळ मगरीचे पुन्हा दर्शन

बाचणी(तानाजी सोनळकर): बाचणी बंधाऱ्याजवळ मगरीचे पुन्हा दर्शन झालेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, बाचणी दूधगंगा नदीलगत दिसलेली मगर ही सुमारे नऊ फूट लांबीची असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाचणी मध्ये सामाजिक वनीकरन विभागाचे संबंधित अधिकारी यांनी पाहणी केली असून मगरीला पकडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, जोपर्यंत मगरीचा बंदोबस्त होत नाही, तोपर्यंत दक्षता घेण्याचे … Read more

मुरगूडच्या “सदाशिवराव मंडलिक ” महाविद्यालयास विभागीय कुस्ती स्पर्धेत विजेतेपद

मुरगूड (शशी दरेकर): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत मूरगूडच्या “सदाशिवराव मंडलिक ” महाविद्यालयाच्या मल्लांनी अकरा गुण मिळवून ग्रीकोरोमसन कुस्ती प्रकारात विजेतेपद पटकाविले. या यशाचे मानकरी खालील प्रमाणे 🙁 ग्रीकोरोमन) १) विजय डोईफोडे – ७७ किलो खाली – प्रथम २) रोहित पाटोळे – ५५ किलो खाली – द्वितीय. ३) मयूर सोनाले ८७ खाली – … Read more

मुरगूडमध्ये शिवप्रेमीतर्फ ” शिवप्रताप दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड बाजारपेठेतील शिवप्रेमिच्या वतीने ३६२वा “शिवप्रताप ” दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री . अमर गिरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले .यावेळी बोलतानां ते म्हणाले १६५९ साली स्वराज्यावर अफझलखानाच्या रूपाने मोठे संकट आले . छत्रपती शिवरायानीं ध्यैर्याने व युक्तीने अफझलखानाचा वध केला . आणि स्वराज्यावरील संकटाचा … Read more

आजी-माजी संघटने च्या वतीने आदर्श मुख्याध्यापिका शाकेरा मुजावर व पहिली महिला जवान अक्षता घाटगे यांचा सत्कार

कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे आजी- माजी जवानांचा सत्कार आजी-माजी संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी सैनिक सखाराम नलवडे होते. यावेळी कै. डी. बी. पाटील विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार व नेशन बिल्डर पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ गार्गीज यांचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल करनूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. … Read more

मुरगूडच्या राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा उत्साहात

बोरवडेचा इंद्रजीत फराकटे प्रथम स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मुरगूड(शशी दरेकर): मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील कला क्रीडा मंडळ संचलित लाल आखाडा यांच्या वतीने कै.श्री.आजितसिह पाटील यांच्या स्मृती प्रत्यार्थ घेण्यात आलेल्या राज्य स्तरीय अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत १६०० मीटर पुरुष खुला गटात प्रथम क्रमांक इंद्रजीत फराकटे (बोरवडे ) द्वितीय क्रमांक प्रवीण गडकरी (संकेश्वर )तृतीय क्रमांकओंकार कुंभार (इचलकरंजी ) … Read more

करनूर- शेंडूर रस्ता खड्डेमय

खड्डे बुजवण्याची होत आहे मागणी कागल( विक्रांत कोरे): करनूर- शेंडूर रोडवरती शेतीसाठी पाईपलाईन खुदाई केल्या आहेत त्यामुळे रस्ता खचला आहे व खड्ड्यांचे स्वरूप निर्माण झाले. पाईपलाईन साठी रोड वरती केलेली खुदाई यामध्ये मोठ- मोठ्या चारी पडल्या आहेत. यामुळे वाहनधारकातून नाराजी व्यक्त होत आहे. अनेक छोटे-मोठे अपघात ही चारी मुळे झाले आहेत. अनेकांना कमरेचे त्रास जाणवत … Read more

घरगुती स्पीड ब्रेकरने गाड्याच ‘ब्रेक’

शहरास अव्यवस्थेचा विळखा, आठवडी बाजाराचे अनियोजन कागल : ‘सर्वांग सुंदर स्वच्छ कागल शहर’ या घोषवाक्याचे सुरुवात झालेल्या मोहीमेच्या दुसर्‍या बाजूला मात्र शहरात अव्यवस्थेने विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. काही गल्ल्यांमध्ये आणि बाजारपेठेतील रस्त्यांवर दुकानदार व स्थानिक लोकांनी आपल्या स्वतःच्या मर्जीने बेकायदेशीर स्पीडब्रेकर (गतिरोधक) चे बांधकाम केल्याने वाहनांना छोटे-मोठे अपघात होत आहेत. तसेच सार्वजनिक मुतारींची दुरावस्था, … Read more

बाचणी नवीन पुलाचे काम रखडले; जुना पुलही वाहतुकीस धोकादायक; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

व्हनाळी  (सागर लोहार) : शंभर वर्षाकडे वाटचाल सुरू असलेल्या बाचणी ता.कागल ते वडकशिवाले ता.करवीर या तालुक्यांना जोडणा-या दुधगंगा नदीवरील खराब झालेल्या जुन्या पुलाचा पावसामुळे स्लॅब व पिलर कोसळले असून पुलावरून सद्या अवजड वाहतुक बंद करण्यात आली आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुल उभारणीचे सुरू असलेले काम गेली 10 महिने ठप्प झाले असून नवीन पुलाचे बांधकाम … Read more

error: Content is protected !!