शारीरिक,मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवण्यासाठी सप्तचक्र संतुलन आवश्यक-मेघाताई बांभोरीकर

कागल प्रतिनिधी : शारीरिक,मानसिक आणि भावनिक आरोग्य टिकवण्यासाठी सप्तचक्र संतुलन आवश्यक आहे.असे प्रतिपादन मेघाताई बांभोरीकर यांनी केले. येथे श्रीराम मंदिर जिर्णोद्धार समिती, कागल यांच्या वतीने महिलांसाठी ‘सप्तचक्र आणि त्यांचे संतुलन’या विषयावर  आयोजित विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानवेळी त्या बोलत होत्या.    या शिबिराचे आयोजन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमाती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह … Read more

Advertisements

मोरया पुरस्कार स्पर्धेत तरुण मंडळांनी सहभाग व्हावे-सौ.नवोदिता घाटगे

राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे सलग आठव्या वर्षी आयोजन कागल प्रतिनिधी: राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन आयोजित ‘मोरया पुरस्कार २०२५’ स्पर्धेत तरुण मंडळांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा.असे आवाहन राजे विक्रमसिंह घाटगे  बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले .   घाटगे पुढे म्हणाल्या,शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव … Read more

कागल येथे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या निपाणीच्या महिलेस अटक

कागल /प्रतिनिधी       कागल बस स्थानकावर संशयास्पद फिरणाऱ्या निपाणीच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी -मंगळसूत्र जप्त केले आहे. ही घटना तारीख 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.        सदरची महिला ही कागल बस स्थानक परिसरात संशयास्पद फिरत होती. नागरिकांनी पाठलाग करून तिला पकडले व कागल पोलिसांच्या स्वाधीन … Read more

कागल येथे होमगार्ड जवानाचा मृत्यू

कागल / प्रतिनिधी :  श्री गणेश उत्सव सर्वत्र साजरा होत आहे. या उत्सव काळात कागल शहरांमध्ये गस्त घालत असताना  चक्कर येऊन पडल्याने होमगार्ड जवानाचा मृत्यू झाला. अविनाश चंद्रकांत पाटील वय वर्षे 38 राहणार शाहूनगर, बेघर वसाहत ,कागल. असे मयत जवानाचे नाव आहे.              या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झालीआहे. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड अविनाश … Read more

गोकुळ शिरगाव पोलिसांची मोठी कारवाई: ७ चोरीच्या मोटरसायकली जप्त, ₹१.२९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : गोकुळ शिरगाव पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत एकूण ₹१,२९,५०० किमतीच्या ७ चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे गोकुळ शिरगाव व कागल पोलीस ठाण्यातील अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. स्थानिक रहिवासी अजित मधुकर काटे यांच्या ₹३५,००० किमतीच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये … Read more

गर्भाशय कॅन्सरमुक्तीच्या लसीकरणामध्ये इनरव्हील क्लबचा पुढाकार लौकिकिस्पद – मंत्री हसन मुश्रीफ

उषाराजे हायस्कूलमध्ये लसीकरण शिबिराला मोठा प्रतिसाद    कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गर्भाशयाच्या कॅन्सर मुक्तीसाठी लसीकरण मोहीम राबविण्यामध्ये इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूरचा मोठा पुढाकार आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.          उषाराजे हायस्कूलमध्ये आयोजित एच. पी. व्ही. लसीकरण शिबिराला विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशन व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर यांच्यावतीने उषाराजे … Read more

राजयोग आणि मेडिटेशनने ताणतणावाचे व्यवस्थापन करा : राजश्री बहेनजी

कागल/ प्रतिनिधी                आज सर्वांनाच ताण-तणावाला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक माणसाला मनशांतीची गरज आहे. मानवी कल्याण आणि शांतीसाठी दादी प्रकाशमणी  यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. प्रत्येकाने शांतीमय जीवनासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करावे. यासाठी राजयोग आणि मेडिटेशनची गरज आहे. असे प्रतिपादन कागलच्या ब्रह्माकुमारी सेंटरच्या राजश्री बहेनजी यांनी केले.         माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी … Read more

कृषि पुरस्कार प्रस्तावासाठी ३० ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांनी, व्यक्तींनी आणि संस्थांनी तातडीने अर्ज सादर करण्याचे आवाहन कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व शेतकरी, व्यक्ती, गट,संस्था यांनी कृषि पुरस्कारासाठी परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करण्याबाबत कळविले होते, पंरतु प्रस्ताव सादर करण्यास दिनांक ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली असल्याची माहिती कृषि उपसंचालक नामदेव परीट व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी … Read more

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार मुंबई : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत. या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा … Read more

कागलच्या बुद्धिबळपटूंना मिळाली संधी : तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न

कागल : कागल तालुकास्तरीय शासकीय बुद्धिबळ स्पर्धा २०२५-२६ नुकतीच ए. डी. माने इंटरनॅशनल स्कूल, कागल येथे पार पडली. सोमवार, २५ ऑगस्ट ते मंगळवार, २६ ऑगस्ट २०२५ या दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित या स्पर्धेत तालुक्यातील २२५ हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपली बुद्धिमत्ता व कौशल्ये सादर केली. स्पर्धेचे उद्घाटन कागल पंचायत समितीच्या गट शिक्षण … Read more

error: Content is protected !!