चिकोत्रा नदी भागामध्ये उपसाबंदी लागू

कोल्हापूर (जिमाका): चिकोत्रा प्रकल्पाच्या चिकोत्रा नदी भागामध्ये पाटबंधारे विभाग (दक्षिण)चे कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांनी पाटबंधारे अधिनियम 1976 नुसार शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसायंत्रावर उपसाबंदी लागू केली आहे. चिकोत्रा नदी को.प. बंधारा 1 ते को.प. बंधारा 29 (बेळुंकी) वर दि. 5 ते 14 डिसेंबर 2024 तसेच दि. 31 डिसेंबर 2024 ते 9 जानेवारी 2025, 26 जानेवारी ते … Read more

Advertisements

चंद्रकांत माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” आत्मचरीत्रास राज्यस्तर पुरस्कार प्रदान

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल)येथील  साहित्यिक  व  मुरगूड विद्यालय मुरगूडचे इंग्रजी विषयाचे माजी आध्यापक,ज्येष्ठ पत्रकार  चंद्रकांत माळवदे यांच्या ” गोवऱ्या आणि फुले ” या  आत्मचरित्रास सर्वोत्तम राज्यस्तर वाङमय निर्मितीचा , मुंबई येथील वंदना प्रकाशन पुरस्कृत ” आशिर्वाद पुरस्कार ” मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ . भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र  व स्मृतिचिन्ह … Read more

कागलमध्ये बिबट्याचे दर्शन, सतर्कतेचा इशारा

कागल( विक्रांत कोरे) : येथील जयसिंगराव पार्क व यशीला पार्क परिसरातील बिबट्याचे दर्शन झाले आहे.नाररिकाना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.              पोलीसांच्या माहिती नुसार,नागरिकांना सुचित करण्यात येते की, रात्री ७.३० ते ७.४५ च्या दरम्यान श्री. जयसिंगराव पार्कच्या कमानीपासून हायवे चा रस्ता ओलांडून यशीला पार्क कडे बिबट्या जात … Read more

कागल विधानसभा साठी जोरदार  चुरशीने मतदान

कागल / प्रतिनिधी : कागल विधानसभा मतदार संघात किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व उत्साहात पार पडली. कागल विधानसभा मतदारसंघात सरासरी 81 टक्के मतदान झाले. मतदारा च उत्साह असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर मतदान शांततेत चालू होते.                 मतदारसंघात मतदान करण्यासाठी सकाळपासूनच चुरस दिसत होती. मतदान केंद्रासमोर महिलांच्या रांगा अधिक होत्या. लिंगनूर दुमाला येथील … Read more

मुरगूड शहरामध्ये कुत्र्यांची दहशत !  थरकाप उडवणारा कुत्र्यांचा संचार !

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरात  कुत्र्यांचे कळपच्या कळप चक्क रस्त्यावरून संचार करताना दिसत आहेत. एकट्याने चालताना कुत्र्यांचा कळप अंगावर येत असल्याने व चावा घेत असल्याने नागरिकांचा थरकाप उडत आहे. निवडणूकीच्या रणधुमाळीत चक्क कुत्र्यानींच दहशत माजवली आहे.           कधी नाही एवढी कुत्र्यांची बेसुमार संख्या मुरगूड शहरात वाढली आहे. गल्ली – बोळातून  व मुख्य … Read more

बाळकृष्ण सणगर यांचे 85 व्या वर्षातील चित्रकलेचे कार्य प्रेरणादायी  : विलास बकरे

कोल्हापूर दि. 04 ( प्रतिनिधी) : हौशी चित्रकार श्री बाळकृष्ण ज्ञानदेव सणगर यांनी  वयोमानाला न जुमानता देवदेवता व महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या चित्रकलेतून जिवंत केल्या आहेत.  त्यांची ही चित्रे म्हणजे भक्तिभाव व कलेचा संगम असून 85 व्या वर्षी त्यांनी केलेले हे कार्य प्रेरणादायी आहे . ” तपस्या ”  या चित्रपटदर्शनाच्या माध्यमातून  सुंदर चित्रे तर पहावयास मिळतीलच  … Read more

लक्ष्मीपूजेचे सर्व ऊस गोळा करून गोशाळेला अर्पण

शिवभक्तांचा दिपावलीतील स्तुत्य उपक्रम मुरगूड ( शशी दरेकर ) : दीपावलीत लक्ष्मी पूजेला मोठे महत्व असते.पूजेसाठी मोठ्या प्रमाणात ऊस वापरले जातात. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे ऊस कचरा गाडीवर चढवले जात असत. पण,    मुरगूड मधील शिवभक्तांनी हे ऊस गोशाळेला अर्पण करायचे ठरवले. गाईंना उत्तम पशु आहार मिळेल .    त्यांनी सर्व लक्ष्मी भक्तांना विनम्र आवाहन केले … Read more

आदर्श जीवन जगण्यासाठी रचनात्मक, वैज्ञानिक दृष्टीकोन हवा- प्राचार्य डॉ . अर्जुन कुंभार

अकॅडमी संस्थापकांचा यथोचित सत्कार संपन्न मुरगूड ( शशी दरेकर ) :  आदर्श जीवन जगण्यासाठी रचनात्मक, सकारात्मक , आणि जबाबदार शैली कशी असावी, वैज्ञानिक दृष्टीकोन प्रत्येकांच्या अंगी असायला हवे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले . ते गंगापूर येथिल भैरवनाथ देवस्थान नवरात्र महोत्सवाच्या आयोजित व्याख्यानात बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगापूरचे पोलिस पाटील श्री गणपतराव पाटील (आण्णा )होते. … Read more

मुरगुड येथे सडलेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह सापडल्याने खळबळ : घातपाताचा संशय

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड- चिमगाव रस्त्यालगत  बागेच्या ओढयाजवळील शेतातील ऊसाच्या सरीत सडलेल्या अवस्थेत बेवारस पुरुषाचा मृतदेह उताणा स्थितीत सापडला.  या प्रकाराने आज शहरात खळबळ माजली. घटनेची मुरगूड पोलीसात नोंद झाली आहे. हा घातपाताचा  प्रकार असल्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.        पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,  मुरगूड – चिमगाव  बागेच्या रस्त्यालगत ओढ्याजवळील संदेश … Read more

केडीसीसी बँकेच्या तज्ञ संचालकपदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची नियुक्ती

मंत्री हसन मुश्रीफ सूचक तर माजी खासदार संजय मंडलिक अनुमोदक कागल(प्रतिनिधी):  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ञ संचालकपदी माजी आमदार संजयबाबा घाटगे यांची सर्वानुमते निवड झाली. आज पालकमंत्री व बँकेचे अध्यक्ष नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी श्री. घाटगे यांच्या निवडीची सूचना मांडली तर माजी खासदार संजय मंडलिक … Read more

error: Content is protected !!