शहिद डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या विचाराची देशाला गरज – कॉ. शिवाजी राऊत

मुरगुड (प्रतिनिधी) : सनातनी विचाराचा उद्रेक देशभर घोंगावत असून देशाचं भविष्य अंधकारमय होत आहे, अशावेळी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकी विचाराची देशाला गरज निर्माण झाली आहे असे मत कॉ.शिवाजी राऊत सातारा यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मुरगुड शाखेच्या वतीने भडगाव येथे आयोजित केलेल्या ‘ कार्यकर्ते व युवक मेळाव्यात ‘  प्रमुख वक्ते म्हणून … Read more

Advertisements

बाचणीत सोनाळकर यांच्या ‘राजगृहाच्या खिडकीतून’ कादंबरीचे प्रकाशन

साके (प्रतिनिधी) : लेखक हे शांतीचे उपासक असतात ते आपल्या लेखनातून नेहमीच समाजाला आर्दशवत घडविण्याचा प्रयत्न करतात.विविध लेख,कथा,कादंबरी या सारख्या लिखानाच्या माध्यमातून झोपलेल्या समजाला शब्द भंडाराने जागे करून चांगल्या विचारांचा प्रसार करण्याचे काम करतात असे प्रतिपादन  लेखक कृष्णात खोत यांनी सांगितले. कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ,कोल्हापूर शाखा – कागल, शिक्षक वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने  बाचणी ता.कागल … Read more

उमेश गवळी स्मरणार्थ रक्तदान शिबिर

कागल : ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ असे समजले जाते. अलिकडे रक्तपेढीमध्ये रक्तसाठा कमी पडत आहे. हीच गरज लक्षात ठेवून येथील युवा उद्योजक आणि श्रीनाथ सहकार समूहाचे संचालक उमेश चंद्रकांत गवळी यांच्या अकराव्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. उमेश गवळी विचार मंच आणि श्रीनाथ सार्वजनिक सेवा ट्रस्ट यांच्या वतीने हा उपक्रम … Read more

लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शरीरसंबंध

मुलगी अल्पवयीन,  तरुणास अटक कागल (प्रतिनिधी) : एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिला लॉजवर नेवून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. हा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कागल येथे घडला. आरोपीसह लॉज मालकास, कागल पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली आहे.      उन्मेश अनिल शिंदे वय वर्षे 19, … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयास  सुविधा, तज्ञ डॉक्टर्सची तातडीने नियुक्ती करा मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयात परिसरातील ३० ते ४० गावचे रुग्ण येतात पण या रुग्णालयात सुविधांची वाणवा आहे . त्या सुविधा उपलब्ध  करून देण्यासाठी व तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याची मागणी मुरगूडमधील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे.           सदर निवेदनात म्हटले आहे कि … Read more

देशातील लैंगिक अत्याचारांचा व हिंदुत्वावरील टीकेचा मुरगूड मध्ये जाहीर निषेध

मुरगूड ( शशी दरेकर) : देशातील लैंगिक अत्याचार व कोल्हापूरात हिंदुत्वा वर  काढलेल्या अपशब्दांचा मुरगूड येथे युवा संघटनांनी जाहीर निषेध केला. कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. बदलापूर येथील शाळेत लहान बलिकांवरील लैंगिक अत्याचार तसेच शिये येथे नराधमाने दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली या गंभीर निर्दयी … Read more

मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावण्याची मागणी

मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावण्याची मागणी वाहनधारकांकडून आंदोलनाचा इशारा मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूडमध्ये आरटीओ ऑफिसने कोटा वाढवावा किंवा जादाचा कॅम्प तातडीने लावावा अशी मागणी करीत या प्रश्नी वाहनधारकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.        मुरगुड मध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी दुचाकी आणि चार चाकी वाहन चालवण्याचा परवाना … Read more

राजीव गांधी यांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा- प्रा. सतीश देसाई

मुरगूड (शशी दरेकर) : “राजीव गांधी यांच्या विचार आणि कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा तसेच देशासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवून राष्ट्र उभारणीच्या कामात झोकून घ्यावे” असे मत आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई यांनी अध्यक्षस्थानावर बोलताना व्यक्त केले. ते गगनबावडा येथील आनंदी महाविद्यालयात आयोजित स्व. राजीव गांधी यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त बोलत होते. … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील हेळसांडपणा

नागरिकांनी अधीक्षकाना धरले धारेवर मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड मध्ये ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या बाबतीत अक्ष्यम्य हेळसांड पणा होत असल्याच्या तक्रारी वारंवार येऊ लागल्याने नागरिकांच्या वतीने एक शिष्टमंडळ येथील वैद्यकीय अधिक्षक डवरी यांना भेटले.रुग्णालयात डॉक्टर हजर नसतात, आठवड्यातून फक्त दोन दिवसच येतात, वार्ड बॉय मार्फत रुग्णांना औषधे दिली जातात अशा तक्रारी नागरिकांनी सांगितल्या. या … Read more

बहिण भावाच्या अतूट नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा मिळते – लता बहेनजी

मुरगूड ( शशी दरेकर ) – बहिण -भावाच्या अतूट नात्यातून विश्वशांतीची प्रेरणा मिळते, मनातील  वाईट विचार, विकार यानां तिलांजली देऊन शुध्द व चांगले विचार आत्मसात करण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यानी केले. मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्रात राखी पौर्णिमेनिमित्य रक्षाबंधनाच्या व भावबंधनाच्या कार्यक्रमात लता बहेनजी बोलत होत्या. प्रथम संघाचे संचालक महादेव वागवेकर यानीं … Read more

error: Content is protected !!