मुरगूडच्या फूटबॉल २०२५ चषक  स्पर्धेत  मुरगूड फूटबॉल क्लब प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर )     मुरगूड फूटबॉल २०२५ चषक स्पर्धेत मुरगूड फूटबॉल क्लबने प्रथम क्रमांक पटकाविला.       फूटबॉल स्पर्धेत सुमारे १६ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील अंतिम सामना मुरगूड फूटबॉल क्लब व गडहिंग्लज फूटबॉल क्लब यांच्यात झाला. या सामन्यात मुरगूड फूटबॉल क्लबने – ३  विरुद्ध १ गोलने  गडहिंग्लज संघास हरविले व अजिंक्यपद पटकावले. या सामन्यात मुरगूड … Read more

Advertisements

पिंपळगाव खुर्द येथे तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; कागल पोलिसांत नोंद

पिंपळगाव खुर्द :कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील एका ३० वर्षीय तरुणाने शेतातील पाण्याच्या मोटारीच्या पेटीला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. अक्षय सुभाष नवाळे असे या मृत तरुणाचे नाव असून, ही घटना रविवारी (दि. २८) दुपारी दोनच्या सुमारास चांभारकी नावाच्या शिवारात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय नवाळे याने … Read more

कागलमध्ये नाताळनिमित्त मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप शिबिर संपन्न

कागल (प्रतिनिधी):नाताळचे औचित्य साधून ‘न्यू लाईफ फेलोशिप चर्च कागल’ आणि ‘आशा धन्वंतरी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हुपरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांना केवळ १०० रुपयांत नंबरच्या चष्म्याचे वाटप करून खऱ्या अर्थाने नाताळचा आनंद साजरा करण्यात आला.प्रमुख उपस्थितांच्या हस्ते उद्घाटनया शिबिराचे उद्घाटन आणि चष्म्यांचे वाटप मा. … Read more

निधन वार्ता – शंकर हरी अर्जुने

मुरगूड येथील शंकर हरी अर्जुने (वय ९७ ) यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात सून, नातू ,नातसून  असा परिवार आहे. उत्तरकार्य सोमवार दिनांक ०५/०१/२०२५ रोजी मुरगूड येथे आहे.

सिद्धनेर्ली परिसरात अघोरी विद्येचे पुन्हा फुटले पेव

नदीकाठी खिळे टोचलेली लिंबे अन् पूजा साहित्य आढळल्याने खळबळ सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून अघोरी आणि अनिष्ट प्रथांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काही वर्षांपूर्वी या भागात अशाच प्रकारचे मोठे जाळे पसरले होते, ज्याबाबत ‘पुढारी’ने वृत्तमालिका प्रसिद्ध करून सविस्तर प्रकाश टाकला होता. त्या वेळी प्रशासकीय धाक आणि सामाजिक जागृतीमुळे या प्रकारांना … Read more

“किरण गवाणकर” यशस्वी उद्योजक, गोर- गरीबासाठी झटणारे व्यक्तिमत्व – शिवाजीराव चौगले

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड बाजारपेठ येथिल किरण गवाणकर हे यशस्वी उद्योजक  व गोरगरीबासाठी कळवळा असणारे व्यक्तीमत्व आहे. त्यांनी कठीण परस्थितीतून आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून चांगली प्रगती केली आहे. त्यांचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. त्यांच्या नगर परिषदेच्या नगरसेवक कार्य- किर्दीत अनेक विकासकामे केली आहेत असे गौरवउद्गार नूतन नगरसेवक शिवाजीराव चौगले यानीं काढले. ते मुरगूड येथिल … Read more

मुरगुड येथील एनसीसी विभागातर्फे जल उत्सव उपक्रम साजरा

मुरगुड ( शशी दरेकर ): कोल्हापूर येथील ५ महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाने २६ डिसेंबर २०२५ रोजी जल जीवन मिशन अंतर्गत जल उत्सव यशस्वीरित्या साजरा केला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एनसीसी कॅडेट्सनी जल संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने मुरगुड येथील सर पिराजी तलावाच्या स्वच्छतेत सक्रिय … Read more

सावर्डे बु॥ येथिल साईबाबा मंदिराचा २३ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी

वर्धापन दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन मुरगूड ( शशी दरेकर ) : सावर्डे बु॥ ( ता. कागल ) येथिल “ओमसाई” मंदिराचा २३ वा वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. २६ / १२ / २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. साईबाबांच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेने हा वर्धापनदिन व साईबाबाचा भंडारा भक्तीभावाने साजरा होत असून त्यानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले … Read more

धोकादायक सिद्धनेर्ली प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्र

जीव धोक्यात घालून सेवा! प्रशासनाचे दुर्लक्ष, रुग्णसेवेवर परिणाम सिद्धनेर्ली : कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील प्राथमिक आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीची निर्मिती सुमारे गेल्या ३५ ते ४० वर्षां पूर्वीची आहे.  दुरुस्ती न झाल्याने सध्या तिची अवस्था अत्यंत धोकादायक बनली आहे. जीर्ण झालेल्या या मोडकळीस आलेल्या इमारतीत डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना अक्षरशः जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करावी लागत आहे, … Read more

हळदवडेत तरुणाचा गळफास घेतल्याने मृत्यू

मुरगूड ( शशी दरेकर ) हळदवडे तालूका कागल येथील ओंकार दतात्रय येजरे वय २३ याचा मंगळवारी सायंकाळी साडेपाच पूर्वी नॉयलॉनचे दोरीने गळफास घेतल्याने मृत्यू झाला. घटनेची नोंद मुरगूड  पोलीसात झाली आहे.     याबाबतची  मुरगूड पोलीसातून मिळालेली माहिती अशी मयत ओंकार यांने कशाच्या तरी नैराशेतून दौलतवाडी तालूका कागल येथील बेलेकर नावाच्या शेतात झाडाला नॉयलॉन दोरीने गळफास … Read more

error: Content is protected !!