प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2024-25 मध्ये सहभागी होण्याचे आवाहन

कोल्हापूर (जिमाका): जिल्ह्यातील शेतक-यांना आता केवळ एक रूपयात पिकांचा विमा उतरता येणार आहे. यासाठी राज्य सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेत ‘सर्वसमावेशक पिक विमा योजना’ सुरु केली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत यंदाचा खरीप हंगाम सन 2023-24 पासून आणि आगामी रब्बी हंगामातील 2025-26 मधील अधिसुचित पिकासाठी ही सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील … Read more

Advertisements

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

मुंबई, दि. २७ : नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी राज्यातील सर्व … Read more

नेर्ली-विकासवाडीत परिसरात वारंवार चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण!

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): नेर्ली-विकासवाडी परिसरात चोऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, पाच ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमध्ये सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विकासवाडी येथील श्री साई कोच बॉडी बिल्डर चे मालक जगदीश मोहनराव यांच्या लक्झरी बसमधील दोन नवीन बॅटरी, एक जुनी बॅटरी, एक गॅस सिलिंडर आणि गाईच्या चाऱ्यासाठी … Read more

कागलमध्ये बिबट्याचे दर्शन, सतर्कतेचा इशारा

कागल( विक्रांत कोरे) : येथील जयसिंगराव पार्क व यशीला पार्क परिसरातील बिबट्याचे दर्शन झाले आहे.नाररिकाना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.कागल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.              पोलीसांच्या माहिती नुसार,नागरिकांना सुचित करण्यात येते की, रात्री ७.३० ते ७.४५ च्या दरम्यान श्री. जयसिंगराव पार्कच्या कमानीपासून हायवे चा रस्ता ओलांडून यशीला पार्क कडे बिबट्या जात … Read more

अपघातात हुपरी चांदी व्यवसायिकाचा मृत्यू

हुपरी (सलीम शेख) – हुपरी येथील कागल एमआयडीसी रोडला असणाऱ्या व्यंकटेश सहकारी सूतगिरणीच्या जवळुन लग्न समारंभ आवरून येत असताना MH-09-BC-2169 अॅक्सिस गाडी उसाने भरलेल्या ट्रॅक्टरने धडक झाली.  व मागून आलेल्या हौदा टेम्पो MH-09-CU- 2854 याचे दोन्ही चाके अंगावरून गेल्याने हुपरीचे सुनील पुरंदर गाट, वय ५० (हुपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष)यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त सुनील … Read more

सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी कल्याण संघटकांचा सुधारित मासिक दौरा

कोल्हापूर(जिमाका): सर्व माजी सैनिक, विधवा, अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याचबरोबर कल्याण व पुनर्वसनच्या दृष्टीने योजना व सवलतीची माहिती देण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथील कल्याण संघटक यांचा माहे डिसेंबर 2024 चा सुधारित मासिक दौरा आयोजित करण्यात आला आहे. संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक, विधवा, अवलंबितांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी … Read more

बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सचिव देविदास कुलाल यांनी दिल्याचे … Read more

जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील मतमोजणी शांततेत संपन्न, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र प्रदान

कोल्हापूर : जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. दहाही मतदार संघातील विजयी झालेल्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत त्या त्या ठिकाणी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये 271 चंदगड विधानसभा मतदार संघात शिवाजी पाटील विजयी, 272 राधानगरी विधानसभा मतदार संघात प्रकाश आबिटकर विजयी, 273 कागल विधानसभा मतदार संघात हसन मुश्रीफ विजयी, 274 कोल्हापूर … Read more

कागल विधानसभा २०२४ निकाल – हसन मुश्रीफ विजयी

26 फेरी अखेर मुश्रीफ 11879 मतांनी विजयी कागल विधानसभा २०२४ निकाल एकूण झालेले मतदान – 3,43,672  श्री. हसन मुश्रीफ – 1,43,828 श्री. समरजितसिंह घाटगे – 1,31,949 इतर – – सविस्तर माहिती पुढील प्रमाणे – मतमोजणी केंद्रावर सध्या मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून लवकरच मोजणी चालु होणार आहे बरोबर 8 वाजता मोजणी सुरू १ फेरी तील … Read more

कणेरीवाडीत युवकाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  ता.22 : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील हॉटेल पार्क इन जवळील शेतकरी पेट्रोल पंपा समोर अंदाजे आज पहाटे  6 वाजून 30 मिनिटांनी अपघात झाला. या अपघातामध्ये चार चाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक देवून सुमारे 40-50 फुट फरफटत नेले यावेळी निखिल मारुती खोत (वय 28, राहणार कणेरीवाडी अक्षता मंगल कार्यालयाजवळ) या युवकाचा … Read more

error: Content is protected !!