५० हजाराची रक्कम प्रामाणिकपणे परत करणाऱ्या विनायक ढेंगे यांचा सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथिल राणाप्रताप चौकातील संतोष हाटेलमध्ये सुभाष नाईकवडी यांचे सापडलेले ५० हजार रुपये व ठेवपावत्या हॉटेल मालक विनायक ढेंगे यानीं प्रामाणिकपणे परत केली. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात असा प्रामाणिकपणा विरळच ..! या प्रामाणिकपणाचे कौतूक पत्रकार महादेव कानकेकर यानीं केले. यावेळी कानकेकर म्हणाले विनायक ढेंगे यानी दाखविलेला प्रामाणिकपणा हा  आदर्शवत … Read more

Advertisements

टोल रद्द करण्याच्या मागणीसाठी मंत्री मुश्रीफ आक्रमक!

कोल्हापूर: पुणे ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे (Pune- Kolhapur National Highway) काम जर ३१ जानेवारीपर्यंत दर्जेदार आणि पूर्ण झाले नाही, तर या महामार्गावरील टोलनाके रद्द करण्याची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मॅरेथॉन बैठकीत मुश्रीफ यांनी रस्त्यांच्या कामावर … Read more

किल्ले बांधणी आधी गडभ्रमती महत्वाची – अरुण माने

स्पर्धैत नवमहाराष्ट्र मंडळाने पटकावला पहिला क्रमांक मुरगूड ( शशी दरेकर ) : मुलांनी किल्ले बांधणी करण्यापूर्वी गडभ्रमंती करणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला त्या किल्ल्याची माहिती होते आणि आपण त्या किल्ल्याची निर्मिती परिपूर्णरित्या आपण करू शकतो असे प्रतिपादन महापारेषण चे अरुण माने यांनी व्यक्त केले. ते नवकला मंचच्या माध्यमातून आयोजित “छोटे मावळे “किल्ले बांधणी स्पर्धेतील विजेत्यांच्या … Read more

भाजप हा आमचा मोठा भाऊ; आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा        

नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा कागल : महायुतीमध्ये भाजपा हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कागलसह गडहिंग्लज, मुरगुड या नगर परिषदांवर कागल विधानसभा मतदारसंघातील आठ जिल्हा परिषद मतदार संघांसह १६ … Read more

कर्नाटकात जाताना शिवसेना (उबाठा) नेते विजय देवणे, संजय पवारांना सीमेवर रोखले!

कागल / प्रतिनिधी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा स्थापना दिवस आहे. कर्नाटक _महाराष्ट्र सिमेवर एक नोव्हेंबर काळा दिन म्हणून पाळला जातो. कर्नाटकात वास्तव्यास असणाऱ्या मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र उबाठा गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, सेना नेते संजय पवार हे शनिवारी सकाळी दहा वाजता कर्नाटकात जात होते. त्यांना महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी रोखून … Read more

कार्तिकी एकादशी निमित्त भक्ती सोहळा शाहू कॉलनीत हरिनामाचा गजर

कागल : कार्तिकी एकादशीच्या पावन निमित्ताने सदाशिव जाधव फाउंडेशन, कागल यांच्या वतीने रविवार, दिनांक २ नोव्हेंबर रोजी शाहू कॉलनी येथे भव्य भक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजल्यापासून होणाऱ्या या कीर्तन व भजनाच्या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्तिकी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. … Read more

मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा! मुंबई : एसटी ही महाराष्ट्राची ‘ लोकवाहिनी ‘ आहे . दररोज लाखो सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासी सेवेचा लाभ घेतात. त्यांना सुरक्षित आणि सौजन्यशील सेवा देणे हे एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे. परंतु काही कर्मचारी कर्तव्यावर असताना मद्यपान करून गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने … Read more

मुरगूडमध्ये पोलिस स्टेशन तर्फे एकता दौड

मुरगूड ( शशी दरेकर ) : सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती एकता दिवस म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. यानिमित्य मुरगुड पोलीस स्टेशन यांच्या वतीने एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आल्यामुळे एकता दौडबद्दल उत्साह निर्माण करण्यात झाला होता. सकाळी ७ वाजता दौड ला सुरुवात झाली. प्रारंभी सहायक पोलीस … Read more

खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातातील नुकसान भरपाईसाठी कागल नगरपरिषदेत समिती गठीत!

कागल (प्रतिनिधी) : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि त्यात जखमी किंवा मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कागल नगरपरिषदेत ‘जनहित याचिका १९/२०२५ नुसार समिती’ गठीत करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपरिषदेने नुकतीच एक जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. समिती स्थापनेची पार्श्वभूमी: मुंबई उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पीआयएल १९/२०२३ (जनहित याचिका) बाबत सुनावणी … Read more

‘शिवशस्त्र शौर्यगाथा’: कोल्हापुरात ऐतिहासिक प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद

आठ महिने चालणार स्पर्धांचा जागर कोल्हापूर: येथील ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या अद्वितीय ऐतिहासिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला असून, पहिल्या दोन दिवसांतच पाच हजारहून अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीने बैठक घेऊन प्रदर्शनाच्या व्यवस्थेचा आढावा घेतला आणि आठ महिने चालणाऱ्या पुढील नियोजनावर चर्चा केली. मुख्य वैशिष्ट्ये: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे उपक्रम: … Read more

error: Content is protected !!