
कारचालकाविरोधात गुन्हा दाखल
मुरगुड ( शशी दरेकर ) : श्रीक्षेत्र आदमापुर येथील संत बाळू मामा यांच्या दर्शना नंतर गावी परतणाऱ्या कार ड्रायव्हरचा गाडी वरील ताबा सुटून खडकेवाडा तालुका कागल येथील नदीच्या संरक्षक कठड्याला जोराची धडक बसून गाडीतील पाच जण जखमी झाले .कारचालक सुजल सागर अस्वले यांचेवर मुरगुड पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे .याबाबत मेघना अस्वले यांनी फिर्याद दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी मेघना अस्वले व आई महादेवी अस्वले , आजी कमळाबाई कवळकट्टी तिघेही राहणार कवळकट्टी तालुका गडहिंग्लज मामी आरती आनगोळकर , मामा भैरू आनगोळकर, दोघेही राहणार बेळगाव असे सर्वजण आदमापूर येथील बाळूमामा दर्शनासाठी गेले होते . देवदर्शन आटोपल्यानंतर ते परतीचे प्रवासास निघाले . मुरगुड निपाणी रोडवर खडकेवाडा जवळील चिकोत्रा नदीच्या पुलावर आले असता ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटून गाडीने पुलाच्या कठड्याला जोराची धडक दिली या अपघातात पाच जण जखमी झाले . या अपघातामुळे गाडीतील महादेवी अस्वले, भैरू बाळकृष्ण आनगोळकर हे किरकोळ जखमी झाले तर आरती गणपती अनगोळकर . आणि कमळाबाई संभाजी अस्वले गंभीरित्या जखमी झाले .चालक मात्र किरकोळ जखमी झाला . या अपघातात गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले तपास हेडकॉन्स्टेबल पाटील करीत आहेत