रणदेवीवाडी(शिवाजी फडतारे) : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम शाळेची उच्चस्तरीय चौकशी होऊन शाळेची मान्यता रद्द करावी अशी मागणी पालक अनिल पुजारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात पुढे म्हणाले की , कसबा सांगाव येथील पालक अनिल पुजारी यांची मुलगी स्वरा अनिल पुजारी हिला बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाधिकारी २००९ नियमानुसार राखीव कोट्यामधून अॉनलाईन लॉटरी पद्धतीने शाळेत प्रवेश मिळाला होता.शाळेने पालकांकडे तीन हजार रुपयांची मागणी केली होती ती पालकांनी नकार दिल्याने जाणीवपूर्वक या शाळेने कागदपत्रांची पडताळणी करून न घेतल्याने राखीव कोट्यातुन एँडमिशन रद्द झाले आहे.
त्यामुळे या मुलगीचे नुकसान झाले आहे.अधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही.त्यामुळे उच्चस्तरीय चौकशी होऊन शाळेची मान्यता रद्द व्हावी अन्यथा १३ सप्टेंबर रोजी पंचायत समिती कागल या ठिकाणी पालक अनिल पुजारी यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
स्वरा पुजारी हिला न्याय देण्यात यावा अन्यथा तिच्या समर्थनार्थ १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर याठिकाणी बोंबा बोंब आंदोलन करण्याचा इशारा भारतीय दलित महासंघ , महाराष्ट्र बहुजन सेना , स्वराज्य सेना यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.