
मुरगूड ( शशी दरेकर ) : महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कर्क रोगावर प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम.हसन मुश्रीफ व आरोग्यमंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा ,तालुका व ग्रामीण रुग्णालय पातळीवर ही मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. अशी माहिती डॉ.डवरी यांनी दिली.
या मोहिमे अंतर्गत ९ ते २६ वयोगटातील मुलींना ह्युमन पॅपीलोमा व्हायरस नावाची लस टोचण्यात येते. ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत डॉ. भगवान डवरी वैद्यकीय अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य पथकाने ही मोहीम राबवली आहे. मुरगुड मधील एकूण सोळाशे मुलींना ही लस देण्यात आली आहे अशी माहिती बाजीराव पाटील औषध निर्माण अधिकारी यांनी दिली.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी कुंभार व परिचारिका कुमारी पूजा पाटील यांनी शासनाच्या या मोहिमेची थोडक्यात माहिती दिली.
ही लस खाजगी बाजारात पाच ते सहा हजार रुपयांना मिळते. शालेय विद्यार्थिनींना मात्र ती मोफत दिली जाते. पालक व शाळा व्यवस्थापन यांच्या सहकार्याबद्दल वैद्यकीय पथकाने आभार मानले.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मुरगुड या शाळेतली ही लस देण्यात आली त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते दगडू शेणवी अजय राजगिरे राजेश गोधडे (समुपदेशक) यांची उपस्थित होती.
संस्थेचे अध्यक्ष व्ही आर भोसले यांनी सर्वांचे स्वागत केले मुख्याध्यापिका जस्मिन जमादार यांनी प्रास्ताविक केले.