कोल्हापूर, दि. 19 :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या महास्वयंम पोर्टलवर एम्लॉयमेंट कार्डची नोंदणी केली आहे व  आधारकार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी एम्लॉयमेंट कार्ड मध्ये आधारकार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.

Advertisements

माहिती अद्यावत करण्यासाठी उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरील  ( Home page) वरील रोजगार (Employment) हा पर्याय निवडून नोकरी साधक (Job Seeker) हा पर्याय निवडून आपला युजर आयडी व पासवर्ड वापरुन Login व्हावे व आधार नंबर या ठिकाणी आपला आधार नंबर नमूद करुन कॅप्च्या (Captcha) टाकून सबमिट (Submit) या बटनावर क्लिक करावे, जेणेकरून आपली माहिती अद्यावत होईल.

Advertisements

सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना, काही अडचण  आल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. माळी यांनी केले आहे.

Advertisements

नवीन नाव नोंदणी पाथ (Employment card)

www.rojgar.mahaswayam.gov.in Home Page     Employment    Job Seeker   Rejister

आधार कार्ड लिंक  करण्याचा पाथ

ज्या उमेदवारांनी  वेबपोर्टलवर (Employment card) काढले आहे.

www.rojgar.mahaswayam.gov.in   Home Page    Employment     Job Seeker       User ID     Pass Word       Login     Adhar Number       Captcha   (Submit) या बटनावर क्लिक करावे.

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!