मुरगूडच्या व्यापारी पतसंस्थेचे संचालक ” प्रदिप वेसणेकरांचा ” वाढदिवसानिमित्य सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचीत असणाऱ्या श्री. व्यापारी नागरी सह. पतसंस्थेचे माजी व्हा. चेअरमन व जेष्ठ संचालक श्री. प्रदिप दत्तात्रय वेसणेकर यांचा ७३ वा वाढदिवस श्री.व्यापारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संस्थेच्या वतीने जेष्ठ संचालक श्री. किशोर पोतदार यांच्या शुभहस्ते अगदी साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

Advertisements

यावेळी संचालक हाजी धोंडिराम मकानदार म्हणाले संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी श्री. वेसणेकर यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानां यापुढेही निरोगी दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली. यावेळी उपस्थित संचालकानीही वेसणेकर यानां भरभरून शुभेच्छा दिल्या. सत्कारप्रसंगी चेअरमन किरण गवाणकर, संचालक प्रशांत शहा, हाजी धोंडिराम मकानदार, किशोर पोतदार, नामदेवराव पाटील, साताप्पा पाटील, शशी दरेकर, प्रकाश सणगर, यशवंत परीट यांच्यासह कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, सेवक वर्ग उपस्थित होता़.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!