थकीत वीज बिल मागितले म्हणून केली मारहाण

मोबाईल ही फोडला

कागल (विक्रांत कोरे) : थकीत वीज बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या वीज तंत्रज्ञास शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. मोबाईलची मोडतोड केली. म्हणून कागल पोलीस ठाण्यात वीज मंडळाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना बेलवळे खुर्द तालुका कागल येथे सकाळी 11 वाजण्या सुमारास घडली. कृष्णात महादेव पाटील राहणार बेलवळे खुर्द तालुका कागल असे आरोपीचे नाव आहे.

Advertisements

      कागल पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार विकास पाटील राह. शेळेवाडी तालुका राधानगरी हे वीज महामंडळाकडे कसबा वाळवा तालुका राधानगरी येथे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे बेलवळे खुर्द गावचा चार्ज आहे .उच्च दाबवाहीनी, लघुदाब वाहिनी याची देखभाल व दुरुस्ती करणे वीज बिलाची वसुली करणे आदी कामे त्यांच्यावर सोपविलीआहेत.

Advertisements

     सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी कृष्णात महादेव पाटील, राहणार- बेलवळे खुर्द यांच्या घरी जाऊन, त्यांच्याकडे 635 रुपये थकीत बिलाची मागणी केली. यावेळी आरोपी पाटील यांनी शिवीगाळ करीत त्यांना काठीने मारहाण केली. विकास पाटील यांच्या हातातिल यादी चुरगाळून ती जमिनीवर फेकली. यावेळी त्यांच्या समवेत असलेला शिकाऊ उमेदवार निखिल संजय चांदणे हा मोबाईल वर शूटिंग करत होता. त्याचा मोबाईल हातातून हिसकावून घेऊन आरोपीने तो जमिनीवर रागाने फेकला .त्यात मोबाईलचे नुकसान झाले. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कांबळे पुढील तपास करीत आहेत.

Advertisements
AD1

1 thought on “थकीत वीज बिल मागितले म्हणून केली मारहाण”

  1. ताजी बातमी व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे खूप छान बातमी तयार केली आहे.

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!