सिद्धनेर्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त पिंपळगाव खुर्द ता कागल येथील श्री बसवेश्वर विकास सेवा संस्थेत फोटो पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी तालुका खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन महेश चौगले यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री बसवेश्वर विकास सेवा संस्था पिंपळगाव खुर्द धान्य दुकानांमध्ये आनंदाचा सिधा वाटप करण्यात आला.
ही शिधा वाटप करताना संस्थेचे चेअरमन श्री महेश मारुती चौगुले सह सर्व संचालक मंडळ ,नागरिक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.