मडिलगे (जोतिराम पोवार ) : अक्षर सागर साहित्य मंच गारगोटी व अक्षर सागर साहित्य पुरस्कार शाश्वत विकास चळवळ मडिलगे खुर्द तालुका भुदरगड येथील साहित्य मंचच्या वतीने नुकतेच साहित्य पुरस्कार वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानी तुकाराम पाटील होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहा. संचालक संपत गायकवाड व बिद्रीचे संचालक धोंडीराम मगदूम होते.
यावेळी कबीर वराळे यांच्या बाल साहित्य विषयक गम्मत..जम्मत या बाल कवितासंग्रहाचे पुस्तक प्रकाशन मडिलगे गावच्या बालचमूंच्या हस्ते करण्यात आले. बाल विश्वातील अनेक विषयावर आधारित कविता मधून बालमनावर संस्कार करण्याचे प्रयत्न करणारे आणि सातत्याने मुलांच्या विश्वात रममाण होणारे बालकवि कबीर वराळे यांनी गम्मत.. जम्मत या कविता संग्रहातून बालमनावर संस्कार करण्याचे अतुलनीय कार्य केले आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांनी तसेच प्रमुख मान्यरांनी साहित्य विषयक मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमास मौनी विद्यापीठाचे माजी संचालक डॉ. जयंत कळके, गारगोटी साहित्य मंचचे अध्यक्ष राजन कोनवडेकर, उपाध्यक्ष प्रा. डॉ. अर्जुन कुंभार, डॉ. मा.गं गुरव,बा.स.जठार,अभिजीत पाटील, सरपंच गौरी खापरे, उपसरपंच सुरेश खोत, बी.एन.खापरे, माधव मांडे,नागोजीराव बिरंबोळे, जे. टी. मगदूम, अशोक पाटील, बाळ पोतदार, (सर ) व्ही.डी. पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन युवराज बिरबोळे, करडे सर यांनी तर आभार डी.व्ही. कुंभार यांनी मानले