gahininath samachar
अंतर विभागीय महिला कुस्ती स्पर्धेत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयास उपविजेतेपद
मुरगुड(शशी दरेकर): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत, आंतर विभागीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयच्या महिला मल्लांनी १३ मिळवून मानाची ट्रॉफीही जिंकली. या यशाचे मानकरी खालील प्रमाणे :- १) अंकिता शिंदे – ५९ किलो खाली – प्रथम, २) अंजली पाटील – ५७ किलो खाली – प्रथम, ३) मेघना सोनुले ५५ किलो खाली – द्वितीय.पुरुष विभागात :- … Read more
मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी जपली सामाजिक बांधिलकी
अपघातग्रस्त बेशुद्ध पेशंटला नेले स्वतःच्या गाडीतून मुरगुड(शशी दरेकर): मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी कौतुकाचा विषय ठरली आहे. त्यांनी रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या अपघातग्रस्त पेशंटला स्वतःच्या गाडीतून नेऊन नंतर ऍम्ब्युलन्समध्ये दाखल केले. शनिवार दि. १८ दुपारी साडेतीनची वेळ. कोल्हापूरवरून मोटारसायकलवरून मुलगीला घेऊन येणारे गोरंबेचे श्री. मच्छिंद्र सदाशिव सुतार, वय ४७ हे गोरंबेच्या घाटात अज्ञात वाहनाने … Read more
कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबना प्रकाराचा मुरगुडमध्ये-तीव्र निषेध
मुरगूड ( शशी दरेकर ): कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. समाजकंटकांनी गुरुवारी रात्री मूर्तीवर विटंबना करण्यात आल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. मुरगूड शहरातील शिवप्रेमींनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला. शनिवारी सकाळी ११ वाजता मुरगूड मधील सर्व शिवप्रेमी बस स्थानक येथे जमा झाले त्यानंतर शिवभक्त … Read more
बार्टी तर्फे संविधान साक्षरता अभियान अंतर्गत दौलतराव निकम हायस्कूल व्हन्नूर येथे व्याख्यान संपन्न
पिंपळगाव खुर्द : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांची स्वायत्त संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे विभाग कोल्हापूर यांच्या वतीने संविधान साक्षरता अभियान अंतर्गत श्री.दौलतराव निकम हायस्कूल व्हन्नूर या ठिकाणी व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. बबलू कांबळे बोलताना त्यांनी समता,स्वातंत्र्य,न्याय व बंधुत्व या नितीमुल्यावर … Read more
वेदगंगा नदीवर बांधलेल्या बस्तवडे-आनुर पुलाचा लोकार्पण सोहळा दिमाखात
ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते व खासदार प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाला सोहळा अर्थसंकल्पीय तरतुदीमधून पुलाच्या बांधकामासाठी दहा लाखाचा निधी मंजूर…… प्रत्येकी २५ मीटर लांबीच्या चार बाळ्यांचा म्हणजेच १०० मीटर लांबीचा व ०७.७५ मीटर रुंदीचा सुसज्ज पूल उभारला…… हलगी- कैताळाच्या निनादात बस्तवडे आणि आनुर येथील माता-भगिनीनी आणला आंबील -घुगऱ्या, लाडू व केळांचा गारवा … Read more
ऊसाचे एकरी ८१ टन उत्पादन ; घोरपडे कारखान्याचे मार्गदर्शन
साके येथील बाळासाहेब तुरंबे यांचा ऊसशेतीत यशस्वी प्रयोग साके : सागर लोहारसाके तालुका कागल येथील प्रगतशील शेतकरी बाळासाहेब परसू तुरंबे यांनी एकरी 35 ते 40 टनावरुन दुसऱ्याच वर्षी तब्बल एकरी 81 टनापर्यंत ऊसाचे विक्रमी उत्पन्न घेवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. यासाठी त्यांनी बेलेवाडी काळम्मा ता. कागल येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या … Read more
जगणे सुंदर होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा : तात्यासाहेब मोरे
व्हनाळी येथे कै. मेजर आनंदराव घाटगे आयटीआय विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व्हनाळी(सागर लोहार): जगाला आज कधी नव्हे इतकी कुशल मनुष्यबळाची गरज आहे.दोन वर्षांचे आय.टी.आय.चे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी जगणे सुंदर होण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सध्या व्यवसायिक शिक्षण महत्त्वाचे असून आयटीआयच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी यशस्वी उद्योजक बनले आहेत. यशाला अनेक बाप असतात मात्र … Read more
सकस आहार, योग्य व्यायाम व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्यांनी कार्यरत राहून स्वविकास साधावा – डॉ. निता नरके
पिंपळगाव खुर्द(आण्णाप्पा मगदूम): श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर येथे झालेल्या किशोरवयीन मुला-मुलींच्या मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही. जी. पोवार होते. सकस आहार,योग्य व्यायाम व वैयक्तिक स्वच्छता या त्रिसूत्रीद्वारे विद्यार्थ्यांनी कार्यरत राहून स्वविकास साधावा असे आवाहन मानवाधिकार पत्रकार संघटनेच्या जनरल सेक्रेटरी डॉ. निता नरके यांनी केले. डॉ. निता नरके … Read more
मुरगूडमधील एम डी रावण – ” सृजन शिल्पकार पुरस्काराने सन्मानीत “
मुरगूड – ( शशी दरेकर) – मुरगूड ( ता कागल) चे माजी नगरसेवक व जेष्ट शिल्पकार एम .डी. रावण यांना सृजन वाचन व साहित्य सांस्कृतिक मंच कोल्हापूर चा ‘ सृजन शिल्पकार पुरस्कार ‘ बहाल करण्यात आला.थोर विचारवंत व लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कोल्हापूरच्या करविर वाचन मंदिरात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष … Read more