उत्कृष्ट लघुउद्योजक जिल्हा पुरस्कारासाठी 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करा

कोल्हापूर (जिमाका) : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उद्योगाशी निगडीत विविध योजना राबविण्यात येतात. जिल्ह्यातील स्थायीरित्या लघु उद्योग नोंदणी झालेल्या उद्योग घटकाकडून जिल्हा पुरस्कार योजनेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उद्योग घटकाने विहित नमुन्यातील अर्ज व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे दि. 31 डिसेंबर 2024 पूर्वी जिल्हा उद्योग केंद्रास सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील यांनी केले आहे.

Advertisements

पुरस्कारासाठी अटी खालील प्रमाणे-

पुरस्कार प्रत्येक कॅलेंडर वर्षास पात्र लघुउद्योग घटकांना देण्यात येतील उदा. वैयक्तिक मालकास किंवा फर्मच्या भागिदारास किंवा खासगी मर्यादित कंपनीच्या कोणत्याही संचालकास जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे तसेच उद्योग घटक संचालनालयाकडे, उद्योग खात्याकडे स्थायीरित्या लघुउद्योग म्हणून नोंदणीकृत झालेला असला पाहिजे. मागील तीन वर्षात सलग उत्पादन व किमान निव्वळ नफा करत असणारे घटक पुरस्कारास पात्र ठरतील. याकामी विहित नमुन्यात पात्र घटकाकडून मागील 3 वर्षाची वर्षनिहाय माहिती अपेक्षित राहील. उद्योग घटकाची सर्वांगीण प्रगती झालेली असावी. उद्योग घटक वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. उद्योग घटकास राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला नसावा.

Advertisements

पुरस्कार योजनेत यशस्वी उद्योग घटकांना अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रशंसा पत्र, शाल व श्रीफळ पुरस्काराच्या स्वरुपात दिले जातात. विहित नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, कोल्हापूर कार्यालयाकडे संपर्क साधावा, असेही श्री.पाटील यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!