वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 16 : मागासवर्गीय विद्यार्थी वैधता प्रमाणपत्राअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केलेला नाही, त्यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, कोल्हापूर कार्यालयात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य उमेश घुले यांनी केले आहे.

Advertisements

सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य समाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.

Advertisements

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर तीन महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला नाही त्यांनी त्वरित अर्ज करावा, असे श्री. घुले यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Advertisements
AD1

1 thought on “वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन”

Leave a Comment

error: Content is protected !!