कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेच्या वतीने कागल येथील गृहरक्षक दलाच्या जवानांनी परेड, वृक्षारोपण व रक्तदान असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन, महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला.
कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी रक्तदान शिबिराचे उद्घाटन केले. येथील संत रोहिदास विद्यामंदिराच्या आवारात सुमारे 21 रोपे लावा वृक्षारोपण विविध मान्यवर हस्ते करण्यात आले.
कागल येथील गृह रक्षक दलाच्या जवानांनी परेड व संचलन केले. संत रोहिदास विद्या मंदिर पासून पागल बस स्थानका जवळच्या शिवाजी चौक मार्गे संचालन करीत कागल नगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
आयोजित रक्तदान शिबिरात महालक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूरच्या वतीने रक्तदान पार पडले. 21 रक्तदान केले.
डॉक्टर उद्धव कसबेकर , प्रियंका पावसे, नेहा बडेकर, समृद्धी मोरे ओमकार परीट, राहुल घोडके यांचे सहकार्य लाभले.
कागल होमगार्ड पथकाचे समादेशक अधिकारी कृष्णात तुकाराम पाटील, फलटण नाईक दिलीप पसारे, माझी समादेशक अधिकारी आनंदा बारड अंशकालीन लिपिक विश्वजीत वरक, मार्गदर्शक संजय घाटगे हे उपस्थित होते.