कागल(विक्रांत कोरे) : अन्नपूर्णा शुगर लिमिटेड केनवडे केमिकल विरहीत साखर गाळप चालू झालेबद्दल करनूर येथे ग्रामदैवत मरीआई तसेच गावातील जागरूक देवस्थान यांना साखर अर्पण करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साखर वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी धनराज घाटगे, बाळासो पाटील, भाऊसाहेब नलवडे, वैभव आडके, विठ्ठल कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी उपसरपंच प्रवीण कांबळे ,सदस्य कुमार पाटील, सतीश धनगर, राजू भोसले, अनिकेत भोसले, दिलीप खोत, तुळशीदास घाटगे, रावसाहेब चौगुले, विनायक पाटील, बाबुराव धनगर, भरत नलवडे, विजय चव्हाण, संजय घोरपडे, राम कुलकर्णी, कुमार चौगुले, विलास चव्हाण, प्रदीप सुतार, सुशा कोरे, बाळासो जोंधळे, युवराज पाटील प्रथमेश जाधव, कपिल चव्हाण, स्वप्नील शिरगावे यांच्यासहित ग्रामस्थ, शेतकरी, कारखाना सभासद उपस्थित होते.