कागल तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी आनंदराव पाटील यांची निवड

कागल : येथील तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या व शांततेच्या वातावरणात पार पडली. अध्यक्षपदी अँड. आनंदराव पाटील, उपाध्यक्षपदी अँड. बजरंग म्हसवेकर, सचिवपदी अँड. अभिजित सांगावकर, सहसचिवपदी अँड. मीनाक्षी जाधव आणि महिला प्रतिनिधी म्हणून अँड. कांचन खंदाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Advertisements

निवडप्रसंगी कागल वकील संघटनेचे सिनिअर व जुनिअर वकील उपस्थित होते. मावळते अध्यक्ष अँड. मिलिंद पाटील यांनी सर्व सभासदांच्या वतीने नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले. नूतन पदाधिकाऱ्यांनी वकील संघटनेचे हित जपून चांगले काम करू, अशी ग्वाही दिली.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!