मुरगूड ( शशी दरेकर ) : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे दि. ०५ ऑक्टोबर २०२४ रोजी एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. “विज्ञान, व्यवसाय आणि मानव्यशास्त्र या विद्याशाखांमध्ये समन्वय साधण्यासाठी सहयोगी नवकल्पना (ICBGCI-2024)” या मुख्य विषयावर शोधनिबंध सादरीकरण व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे. परिषदेचे उद्घाटक डॉ. दिलिप जवळकर हे असणार आहेत.
यावेळी प्रा. सुबोध शर्मा (पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकी विभाग, काठमांडू विद्यापीठ, नेपाळ) यांचे बीजभाषण आणि डॉ. सागर डेळेकर ( समन्वयक, नॅक, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. दुपारच्या सत्रात देशाच्या विविध भागांतून सहभागी झालेल्या संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे शोधनिबंध सादरीकरण होईल.
या सत्रात विज्ञान विभागात डॉ. एल. पी. लंका (प्राणीशास्त्र विभाग, देवचंद कॉलेज, अर्जुननगर) आणि डॉ. एस. ए. व्हनाळकर (कर्मवीर हिरे कॉलेज, गारगोटी), व्यवसाय व वाणिज्य विभागात डॉ. के. व्ही. मारुलकर (वाणिज्य आणि व्यवस्थापन विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि डॉ. एम. ए. कोळी ( वाणिज्य विभाग प्रमुख, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड) तर मानव्यशास्त्र विभागात डॉ. एन. आर. पाटील (गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेज फॉर वूमन, बेळगावी) व डॉ. रविंद्र भनगे (माजी विभागप्रमुख, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) हे अनुक्रमे साधन व्यक्ती आणि अध्यक्ष असणार आहेत. समारोपीय सत्रात डॉ. टी. एम. चौगुले (संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई (संस्थापक अध्यक्ष, आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे) यांचे मार्गदर्शन आणि सन्मानपत्र वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेला संशोधकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्था अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, संस्था सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एस. पानारी, निमंत्रक डॉ. संतोष भोसले व प्रा. राहुल कांबळे, समन्वयक प्रा. ए. एस. कांबळे व प्रा. ए. आर. गावकर आणि खजिनदार प्रा. एस. एस. घाटगे उपस्थित होते.