गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : शुक्रवार दि.३१ जानेवारी २०२५ आंबूबाई पाटील इंग्लिश मिडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,गोकुळ शिरगाव या ठिकाणी “गणित दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. गणित दिन २०२४अंतर्गत मराठी विज्ञान परिषद,कोल्हापूर विभागामार्फत करवीर तालुक्यातील विविध शाळांतील गणित शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व गणित सोपं करून कसं शिकवावे याचे मार्गदर्शन दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. रावसाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.
तसेच अमर भोसले, डॉ.अंजली साळवी , स्वाती कोरगावकर हे कार्यक्रमात उपस्थित होते.”गणित दिनी” रावसाहेब पाटील यांच्या हस्ते गणित तज्ञ रामानुजन यांचे फोटो पूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यावेळी संस्थापक के .डी .पाटील सर, प्रिन्सिपल तेजस पाटील , व्हाईस प्रिन्सिपल एन. बी. केसरकर मॅडम,शाळेच्या मुख्याध्यापिका .एस. के. पाटील मॅडम, गणित विभाग शिक्षक, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली, मुलांनी ही अतिशय उत्साहात कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, गणितावरती आधारित वेगवेगळ्या उपक्रमावरती मुलांनी तक्ते व कृती सादर केल्या.
प्रमुख पाहुणे रावसाहेब पाटील सरांनी व डॉ.अंजली साळवी मॅडम यांनी मुलांना त्यांच्या सुंदर शब्दात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मला केसरकर मॅडम यांनी केले व .के. डी.पाटील सर यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली. मुलांच्या मनातील गणिताची भीती अगदी सोप्या व साध्या पद्धतीने दूर व्हावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहात झाली, मुलांनी ही अतिशय उत्साहात कार्यक्रमांमध्ये भाग घेतला, गणितावरती आधारित वेगवेगळ्या उपक्रमावरती मुलांनी तक्ते व कृती सादर केल्या. या उपक्रमामध्ये ज्या मुलांनी सहभाग घेतलेला आहे त्या मुलांचे नंबर काढले गेले. यामध्ये दोन संघात त्याची विभागणी केली गेली.
पहिली ते चौथी व पाचवी ते नववी.
पहिले ते चौथी मध्ये
१. आरुषी योगेश पाटील, इयत्ता दुसरी प्रथम क्रमांक
2. शौर्य विशाल आवटे, इयत्ता दुसरी द्वितीय क्रमांक
3. वेदांत संतोष लोंढे, इयत्ता दुसरी तृतीय क्रमांक
उत्तेजनार्थ-
१. राजवीर विजय मोरे, इयत्ता दुसरी
2. स्वानंदी पवन पाटील, इयत्ता पहिली
3. यश सुनील कुंभार, इयत्ता चौथी
गट क्रमांक दोन पाचवी ते नववी
१. सिद्धी संग्राम यादव, इयत्ता सातवी प्रथम क्रमांक
2. सिद्धेश कृष्णा पाटील, इयत्ता नववी द्वितीय क्रमांक
3. रोशनी रमेश देसाई, इयत्ता आठवी तृतीय क्रमांकउत्तेजनार्थ-
१. प्रांजली विनोद कदम, इयत्ता आठवी
2. ज्योती सजावट पंडित, इयत्ता सहावी
3. मनस्वी राजाराम मोरे, इयत्ता पाचवी.
वरील सर्व मुलांना पारितोषके देण्यात आलीत. प्रमुख पाहुणे रावसाहेब पाटील सरांनी व डॉ. अंजली साळवी मॅडम यांनी मुलांना त्यांच्या सुंदर शब्दात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. निर्मला केसरकर मॅडम यांनी केले व .के. डी. पाटील सर यांनी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली. मुलांच्या मनातील गणिताची भीती अगदी सोप्या व साध्या पद्धतीने दूर व्हावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता.