20/01/2025

About us

गेले २3 वर्ष वाचकाच्या हृदयावर राज्य करणारे 

एकमेव निर्भीड साप्ताहिक 

‘ गहिनीनाथ समाचार’

 आजच्या काळात वर्तमानपत्रे चालवणे अवघड झाले आहे. छोटी वृत्तपत्रे आर्थिक अडचणीत आली आहेत. या वृत्तपत्रांना शासनाचा भक्कम पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. काही अडचणी असल्या तरी आमचे ‘गहिनीनाथ समाचार’ हे साप्ताहिक आम्ही नेटाने चालविले आहे. वाचकांचा भक्कम पाठिंबा असल्याने समाचारचा खप वाढला आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. त्यामुळे आमचा समाचार वाचकांच्या पसंतीला उतरला आहे. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक संपादक स्वर्गीय दिलीपरावजी सणगर यांच्या पत्रकारितेचा वारसा आम्ही चालवत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा मोठा पगडा आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव, खंडेराव बागल, माधवराव बागल, ग.गो.जाधव, सत्यवादीकार बाळासाहेब पाटील, डी.आर.माने या सत्यशोधकी मंडळींचा विचार घेऊन आम्ही चाललो आहोत. 10 सप्टेंबर 1999 रोजी दिलीपराव सणगर यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वीस वर्षात वटवृक्ष झाला आहे. वाचकांच्या पाठिंब्यावर आमची वाटचाल यशस्वी झाली आहे. गहिनीनाथ समूहाचे सर्व सहकारी यांचे सतत मार्गदर्शन असते

Copyright © All rights reserved. | DarkNews by AF themes.
error: Content is protected !!