गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : ता.22 : कणेरीवाडी (ता. करवीर) येथील हॉटेल पार्क इन जवळील शेतकरी पेट्रोल पंपा समोर अंदाजे आज पहाटे 6 वाजून 30 मिनिटांनी अपघात झाला. या अपघातामध्ये चार चाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक देवून सुमारे 40-50 फुट फरफटत नेले यावेळी निखिल मारुती खोत (वय 28, राहणार कणेरीवाडी अक्षता मंगल कार्यालयाजवळ) या युवकाचा अपघात झाला.
अधिक माहिती अशी की, बेंगलोर-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार कागल -कोल्हापूर मार्ग वरून भावा रामा राम हे आपले चार चाकी वाहन क्रमांक केए 01 एमटी 7363 हे वाहन घेऊन बेंगलोर वरून कोल्हापूरच्या दिशेने जात होते. यावेळी कणेरीवाडी येथे हॉटेल पार्क इनच्या काही अंतरच्या मागे आल्यानंतर त्यांचा त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला.
यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या निखिल खोत यांच्या (एमएच 09 डीक्यू 7066) दुचाकीला कणेरीवाडीच्या जवळ मागून धडक दिली. यामध्ये निखिल खोत हे गंभीर जखमी झाले होते.
निखिल खोत हे कोल्हापूर येथील मार्केट यार्ड मध्ये ट्रक चालक म्हणून काम करत होते. त्यांचे आठ महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. नेहमी प्रमाणे सकाळी उठून ते कामावर जाण्यासाठी निघाले होते. यावेळी महामार्गावरून भरधाव येणाऱ्या कारणे त्यांना धडक दिली त्यामुळे हा अपघात झाला.
यानंतर गावांमधील एका शेतकऱ्याने निखिल यांना शासकीय दवाखान्यात दाखल केले यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचे सर्व विच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नितीन यांच्या मागे पत्नी, आजोबा, आई-वडील असा परिवार आहे. त्यांच्या अशा अवेळी जाण्याने संपूर्ण गावांमध्ये शोक कळा पसरली आहे.
या अपघाताप्रकरणी चार चाकी चालक भावा रामराम (वय 40, राहणार महादेवजी मंदिर बालवाडा,जालोर राजस्थान)
यांच्यावर गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी सहाय्यक फौजदार भवारी हे अधिक तपास करत आहेत. महामार्गाच्या शितील कामामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ एक ते दीड वर्षापासून कराड ते कागल महामार्गाचे सहा पदरीकरण सुरू आहे.
यामुळे परिसरातील अनेक अपघात झाले व मोठ्या प्रमाणात अपंगांची वाढ झाली आहे. झालेल्या या अपघातामध्ये महामार्गावर सुरू असणाऱ्या कामांमध्ये कोणत्याही पद्धतीचे फलक, रिफ्लेक्टर न लावल्यामुळे अपघात झाल्याची चर्चा नागरिक करत आहे. या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी फलक किंवा रिफ्लेक्टर लावावेत अशी मागणी देखील लोकांकडून होत आहे.