सुमारे दोन लाखांचा ऐवज लंपास
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ( ता. कागल ) येथे पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर असणाऱ्या सुर्यवंशी कॉलनीतील सेवानिवृत प्रिन्सिपॉल मिलिंद गोपाळ जोशी यांच्या बंद बंगाल्याचा कडी -कोयंडा तोडून चोरटयानी दोन लाखांचा ऐवज लंपास केला. शहरात काही दिवसापासून अशा बंद घरात चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढले आहे . त्यामुळे नागरीकात घबराटीचे वातावरण आहे.
मुरगूड येथिल सुर्यवंशी कॉलनीमधील प्रिन्सिपॉल मिलिंद जोशी हे कामानिमित्य परगावी गेले होते . अज्ञात चोरट्यानी ५तारखेच्या मध्यरात्री कडी -कोयंडा उचकटून बंगाल्यात प्रवेश केला. तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून सुमारे दीड तोळ्यांच्या दोन चेन , व रोख रक्कम ५५ हजार असा सुमारे दोन लाख किमतीचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला.
सेवानिवृत- प्रिन्सिपॉल मिलिंद जोशी हे दहा दिवस कामानिमित्य परगावी गेले होते. त्यांच्या घरी काम करण्यासाठी येणाऱ्या महिलेने दरवाज्याची कूलपासह कडी कोयंडा उचकटल्याचे पाहिले. आणि त्यानी तात्काळ जोशी यानां याबाबत फोनवरून कल्पना दिली. रविवार दि. ६ / २ / २०२२ रोजी रात्री ते उशिरा मुरगूडमध्ये आले नंतर पोलिसानी पंचनामा केला .डी.वाय.एस.पी. संकेत गोसावी यानी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली. या अज्ञात चोरट्याविरुद्ध मुरगूड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे . अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.