विश्वासाने दिलेले दागिने परत न दिल्याने केला गुन्हा नोंद

कागल /प्रतिनिधी : विश्वासाने दिलेले दागिने परत न दिल्याने कागल पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. १ लाख ७२ हजार ५००रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार बाचणी तालुका कागल येथे घडला आहे.

Advertisements

         केराबाई सुभाष महेकर वय वर्षे 55 व सुभाष गोविंद महेकर वय वर्षे 62 मूळ राहणार पालकरवाडी तालुका राधानगरी सध्या राहणार बाचणी तालुका कागल अशी आरोपींची नावे आहेत.

Advertisements
https://app.turtlefin.com/products/credit-card/public?partnerId=630e5137e72e970ef99f3b99

         तारीख 14 मार्च व  09 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजता कोल्हापुरी साज, सोन्याची बोरमाळ व 48 मण्यांचे गंठण या किमती वस्तू म़ंगल धोंडीराम पाटील राहणार बाचणी यांच्याकडून विश्वास संपादन करून घरात कोणी नसल्याचे पाहून मागून घेतल्या व त्या वेळोवेळी मागूनही परत दिल्या नाहीत. त्यामुळे आपली फसगत झाली असे लक्षात आले. मंगल पाटील यांनी कागल पोलिसा तक्रार दाखल केली.

Advertisements

       आरोपी केराबाई महेकर व सुभाष महेकर हे फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात भुदरगड पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहेत. पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे हवालदार सी एस बांबळे हे करीत आहेत.

AD1

1 thought on “विश्वासाने दिलेले दागिने परत न दिल्याने केला गुन्हा नोंद”

Leave a Comment

error: Content is protected !!