पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी तलाट्यासह एकावर गुन्हा दाखल

तलाठी प्रदीप अनंत कांबळे व गणपती रघुनाथ शेळके यांच्यावर कारवाई

मुरगूड ( शशी दरेकर ) – मुगळी ता – कागल गावातील शेत जमिनीच्या हक्कसोड पत्राप्रमाणे शेत जमिनीच्या डायरी उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी व नाव नोंदणी करून डायरी उतारा देण्यासाठी  पाच हजार रुपये  लिंगनूर सर्कल यांच्याकडे तक्रारदार यांना देण्यास प्रोत्साहन दिल्याचे  तपासात निष्पन्न झाल्याने तलाट्यासह  एकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी गुन्हा दाखल केला आहे . तसेच दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

Advertisements
प्रदीप कांबळे ( तलाठी )

          या प्रकरणी जैन्याळ – मुगळी सज्जातील (ता – कागल ) तलाठी प्रदीप अनंत कांबळे ( वय – ३२ )  रा. रोहीदास गल्ली मुरगुड, ता. कागल (मुळ रा.तरसंबळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) व तलाठी कार्यालयात काम करणारा गणपती रघुनाथ शेळके (वय ४६, रा.जैन्याळ, ता. कागल) या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर च्या पथकाने  ताब्यात घेतले असून मुरगुड पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisements
गणपती शेळके ( तलाठी ऑफिस मध्ये काम करणारा  )
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!