बामणी येथील विविध फंडातुन केलेल्या साडे आठ कोटीच्या विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण
सिध्दनेर्ली : आमच्या शेतकरी यांचे हक्काचे पाणी आम्ही देणार नाही, तुम्ही इकडे येण्याचे धाडस करू नका असा अप्रत्यक्ष इशारा ना हसन मुश्रीफ यांनी दिला ते बामणी ता कागल येथे विविध फंडातुन केलेल्या साडे आठ कोटीच्या विकासकामांच्या शुभारंभ व लोकार्पण प्रसंगी बोलत होते. अध्यक्षपदी माजी आमदार संजय घाटगे होते.
यावेळी ना हसन मुश्रीफ म्हणाले आमचे हक्काचे पाणी अनेकांनी कार्यक्षेत्राबाहेर नेले त्यामुळे आमची पिके वाळली.तुमच्या वाटणीचे पाणी यापुर्वीच बोगद्यातुन नदीत सोडले आहे.इंचलकरंजीसाठी मजले जवळुन शंभर वर्ष पुरेल अशी योजना करणेसाठी मी प्रयत्न करतो पण दुधगंगा कडे येणेचे धाडस करू नका.सर्व हॅास्पिटल एम्सच्या धरतीवर करणार असुन मी आणलेला निधी पाहुन विरोधकांचेही डोळे पांढरे होतील.
यावेळी खासदार संजय मंडलीक म्हणाले ज्यांनी काळम्मावाडी धरणासाठी त्याग केला ते सोडुन दुसरेच लाभ घेत आहेत.कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना होवु देणार नाही. आमचे पाणी पळवु देणार नाही.प्रत्येकजण उठतो आणी आमचे हक्काचे पाणी नेतो हे आता चालणार नाही.कागल व जिल्हाच्या विकासासाठी आम्ही तिघे एकत्र आहोत.
आम्ही नदी स्वच्छ राखली हा आमचा दोष आहे का? – माजी आमदार संजयबाबा घाटगे
यावेळी संजय घाटगे म्हणाले आम्ही नदी स्वच्छ राखली हा आमचा दोष आहे का? तुम्ही बेजबाबदार वागुन नदी प्रदुषित केला व आराखाड्यात नसलेले पाणी मागता?हे शक्य नाही.आम्ही सर्व एक आहोत कोणाचीही हिमंत होणार नाही पाणी नेण्याची.विक्रमसिंह घाटगेनी हे पुढचे धोके ओळखूनच पाण्याचा हिशोब मागीतला होता.
यावेळी मनिषा पाटील, कोमल बुवा, भिमराव माने, नेताजी बुवा, तानाजी मगदुम यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत बाबुराव मगदुम, प्रास्ताविक युवराज पाटील तर आभार अरविंद मगदुम यांनी मानले. कार्यक्रमासाठी धनराज घाटगे,युवराज कोईगडे,विष्णु बुवा,शिवाजी मगदुम,तानाजी मगदुम,पांडुरंग पाटील उपस्थित होते.
You have remarked very interesting details! ps nice web site..