मुरगूड / प्रतिनिधी : सातारा येथे २३ व्या वरिष्ठ महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांनी वर्चस्व गाजविले . महिलांच्या दहा वजन गटापैकी ४ वजन गटात मंडलिक आखाड्याच्या महिला मल्लांनी प्रथम क्रमांक पटकावत कोल्हापूर जिल्ह्यास अजिंक्यपद मिळवुन दिले . या चौघींची अयोध्या ( उत्तरप्रदेश ) येथे १० ते १४ नोहेबंर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ट अजिंक्यपद कुस्ती निवड झाली आहे.
सातारा येथे वरिष्ट गटासाठी झालेल्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धत येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या महिला मल्लांनी वर्चस्व मिळविले .महिलांच्या दहा वजन गटापैकी ४ वजन गटात प्रथम क्रमांक, तर एक रौप्य व एक कांस्यपदक पटकावले आहे . यामध्ये नंदिनी बाजीराव साळोखे ( ५० किलो ), स्वाती संजय शिंदे ( ५३ किलो ), अंजली आनंदराव पाटील ( ५५ किलो ), वेदांतिका अतुल पवार ( ६८ किलो ), अंकिता आनंदा शिंदे ( ६२ ) रौप्य, मेघना पांडूरंग सोनुले ( ५० ) कांस्यपदक पटकावले आहे.
अंतिम फेरीत नंदिनी साळोखे हिने शिवाजंली कोळेकरला ( सोलापूर ) १०-०, स्वाती शिंदे हिने कोमल देसाई ला (ठाणे ) १०-०, अंजली पाटीलने उंपात्य फेरीत राष्ट्रीय विजेत्या विश्रांती पाटीलला पराभूत केले . तर वेदांतिका पवारने रूपाली माने ( कोल्हापूर ) हिला पराभूत केले .
त्यांना एनआयएस कोच दादासाहेब लवटे, वस्ताद सुखदेव येरूडकर यांचे मार्गदर्शन तर खा .संजय मंडलिक , अॅड . वीरेंद्र मंडलिक यांचे प्रोत्साहन लाभले .