सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली प्राथमिक शाळेचे यश कौतुकास्पद असून भविष्यात जिल्ह्यात आदर्श व अग्रेसर अशी ही शाळा बनवू असा आशावाद सरपंच श्री दत्तात्रय पाटील यांनी व्यक्त केला. कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील कुमार व कन्या प्राथमिक शाळांना ग्रामपंचायतीकडून फर्निचर व क्रीडा साहित्य शाळार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी शाळेमधील विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व ग्रामपंचायत मार्फत आवश्यक फर्निचर, क्रीडा साहित्य व अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही.जी.पोवार, मुख्याध्यापक गणेश पुजारी, मुख्याध्यापिका शालन कुंभार यांची भाषणे झाली.
या समारंभास उपसरपंच वर्षा आगळे कागल तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक कृष्णात मेटील, ग्रामपंचायत सदस्य रत्नप्रभा गुरव, वनिता घराळ, संगीता पोवार, रेखा मगदूम, विद्या कांबळे, दशरथ हजारे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक विद्या चव्हाण यांनी केले सूत्रसंचालन विद्या भोसले यांनी केले. आभार तानाजी तारदाळे यांनी मानले.